IMPIMP

Ration Card | रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर ! मोदी सरकारने मोफत रेशनसंदर्भात घेतला ‘हा’ मोठा निर्णय

by nagesh
Ration Card | narendra modi cabinet extended free ration scheme under pmgkay till december 2022

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Ration Card | पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana (PMGKAY) आणखी तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील रेशन कार्डधारकांना (Ration Card) डिसेंबरपर्यंत मोफत रेशन (Free Ration) मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारने (Central Government) कोविड काळात ही योजना सुरू केली होती. नंतर मार्च 2022 मध्ये ती 6 महिन्यांसाठी सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. आता सरकारने पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, काही माध्यमांनी ही योजना सहा महिन्यांसाठी वाढविल्याचे म्हटले आहे.

देशात 80 कोटी लोक दारिद्रय रेषेखाली असून या योजनेचा ते फायदा घेत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले होते.
म्हणजेच आता 80 कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनीही ही योजना आणखी पुढे वाढविण्याचे संकेत दिले होते.

या योजनेवर आतापर्यंत एकूण 3.40 लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत.
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील गरीब रेशन कार्डधारक (Ration Card) कुटुंबांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जाते.
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना असल्याचा मोदी सरकारचा (Modi Government) दावा आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ration Card | narendra modi cabinet extended free ration scheme under pmgkay till december 2022

हे देखील वाचा :

Shivsena Chief Uddhav Thackeray | शिरुरमध्ये काही लोकं ‘ढळली’ पण खरी ‘अढळ’ लोकं माझ्यासोबत, उद्धव ठाकरेंचा आढळराव पाटलांना टोला

CM Eknath Shinde | अशोक चव्हाणांच्या गौप्यस्फोटानंतर आणखी एका नेत्याचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदे 15 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते

Pune Crime | सराईत गुन्हेगार तुषार हंबीर याच्यावर ससून हॉस्पिटलमध्ये हल्ला करणाऱ्या नोन्या वाघमारे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 97 वी कारवाई

Related Posts