IMPIMP

Ration Card Portability Scheme | गरिबांसाठी संपूर्ण देशात ‘ही’ योजना लागू, शेवटी सहभागी झाले ‘हे’ राज्य

by nagesh
Ration Card News | ration information on mobile know how to get facility

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRation Card Portability Scheme | गरिबांना लाभ देणारी रेशन कार्ड पोर्टेबिलिटी योजना (Ration Card Portability
Scheme) आता संपूर्ण देशात लागू करण्यात आली आहे. आसाम (Assam) हे एकमेव राज्य शिल्लक होते, ज्याने अद्याप ही योजना स्वीकारली नव्हती.
आता आसामनेही रेशन कार्ड पोर्टेबिलिटी स्वीकारली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अशाप्रकारे ‘एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ (One Nation, One Ration Card) ही प्रणाली आता अमलात आली आहे. अन्न मंत्रालयाने (Food Ministry) ही माहिती दिली.

आता देशभरात सबसिडीवर रेशन

वन नेशन, वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 (NFSA 2013) च्या कक्षेत येणार्‍या लोकांना आता देशात कुठेही अनुदानित अन्नधान्य (Subsidised Ration) मिळू शकते. रेशनकार्ड दुसर्‍या राज्याचे असले तरी गरिबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. (Ration Card Portability Scheme)

यासाठी, लाभार्थ्याला त्यांच्या विद्यमान रेशनकार्डच्या आधारे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करून इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल डिव्हाइसने सुसज्ज असलेल्या कोणत्याही ’योग्य रास्त भाव दुकाना’मध्ये (Fair Price Shop) सबसिडी रेशन मिळेल.

ऑगस्ट 2019 मध्ये सुरू झाली योजना

मंत्रालयाने म्हटले आहे की, ’एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ स्वीकारणारे आसाम हे 36 वे राज्य/केंद्रशासित प्रदेश बनले आहे. यासह आता देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ’एक राष्ट्र, एक रेशन कार्ड’ ही प्रणाली सुरू झाली आहे.

आता अन्न सुरक्षा व्यवस्था देशभरात पोर्टेबल झाली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने ’वन नेशन, वन रेशन कार्ड’ प्रणाली लागू करण्यास सुरुवात केली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दर महिना इतक्या लोकांना मिळत आहे लाभ

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रेशन कार्ड पोर्टेबल बनविल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 च्या लाभार्थ्यांना अनुदानित रेशन सुनिश्चित करण्यात मदत झाली आहे.

यामुळे स्थलांतरित लाभार्थ्यांना विशेषत: कोविड महामारीच्या गेल्या दोन वर्षांमध्ये मदत झाली आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सन 2019 पासून आतापर्यंत देशात 71 कोटी पोर्टेबल रेशन ट्रांजक्शन झाले आहे
आणि त्यामध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे रेशन लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.

सध्या, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अंत्योदय योजना (PMGKAY)
अंतर्गत दरमहा सरासरी 3 कोटी पोर्टेबल रेशन ट्रांजक्शन होत आहेत.

Web Title :- Ration Card Portability Scheme | ration card portability scheme now assam adopted nationwide coverage poor benefits

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन युवतीवर अत्याचार करुन केले गर्भवती

Pune Pimpri Crime | मुलीच्या नावाने तो करत होता चॅटींग, प्रकार उघडकीस येताच तरुणाच्या डोक्यात मारला पाना

Related Posts