IMPIMP

Ration Card | रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव नोंद करायचे आहे का ?; जाणून घ्या प्रक्रिया

by nagesh
Ration Card | ration card follow these step by step process to add new member name in ration card

सरकारसत्ता ऑनलाइन – Ration Card | रेशन कार्ड (Ration Card) हे एक देशातील सर्वसामान्यांचे महत्वाचे दस्तऐवज आहे. रेशन कार्डावर
माफक दरात धान्य उपलब्ध होते. तसेच कोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून (Central Government) प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत
(Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) मोफत धान्य देण्यात आलं. ही योजना सप्टेंबर 2022 पर्यंत उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जवळ
रेशन कार्ड (Ration Card Add New Member Name) असणे महत्वाचे आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

अशातच रेशन कार्डमध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांचे नाव, वय, पत्ता इत्यादी नोंदवलेले असते. अनेकदा घरात मूल जन्माला आल्यानंतर अथवा कुटुंबात
नवीन सून आल्यानंतर लोकांच्या नवीन सदस्याचे नाव जोडावे लागते अथवा त्यात नमूद करावे लागते. त्यामुळे रेशनही सहज मिळते. या पार्श्वभूमीवर
रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव कसे जोडायचे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या. (Ration Card)

कागदपत्रे कोणती लागतील ?

 रेशन कार्ड धारकाचा पासपोर्ट आकाराचा फोटो
 सुनेचे आधार कार्ड
 पतीचे आधार कार्ड
 विवाह प्रमाणपत्र
 मुलाचे जन्म प्रमाणपत्र
 पालकांचे आधार कार्ड

ऑनलाईन रेशन कार्डात अशी नावे टाका –

 यासाठी तुम्ही प्रथम राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या वेबसाइटला भेट द्या.
 यानंतर, होमपेजवर जा आणि एका व्यक्तीचे नाव जोडा.
 यानंतर, पुढील मागितलेली सर्व कागदपत्रे सबमिट करा.

 यानंतर सर्व माहितीची पडताळणी करा.
 यानंतर, काही दिवसात, त्या नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत जोडले जाईल.
 यामुळे तुम्हाला त्या सदस्याचे रेशनही सहज मिळेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ऑफलाइन पद्धत जाणून घ्या –

 यासाठी तुम्हाला सर्वात आधी अन्न पुरवठा केंद्रात जावे लागेल.
 यानंतर, तुम्हाला नाव जोडण्यासाठी एक फॉर्म दिला जाईल, जो तुम्ही भरा.
 यानंतर तुम्ही फॉर्म भरा आणि विनंती केलेल्या कागदपत्राची एक कॉपी अटॅच करा.
 त्यानंतर काही फी जमा करा आणि पावती मिळवा.
 यानंतर, काही दिवसात, त्या नवीन सदस्याचे नाव शिधापत्रिकेत जोडले जाईल.

Web Title :- Ration Card | ration card follow these step by step process to add new member name in ration card

Related Posts