IMPIMP

Ravi Rana | आमदार रवी राणांवर IPC 307 कलमान्वये FIR, राजकीय वाद चिघळला

by nagesh
Ravi Rana | uddhav thackeray call to suppress umesh kolhe murder case ravi rana allegation shambhuraj desai ordered an inquiry

अमरावती :  सरकारसत्ता ऑनलाइनअमरावती शहरातील (Amravati City) राजापेठ उड्डाणपुलाच्या (Rajapeth Flyover) भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरुन पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर (Municipal Commissioner Dr. Praveen Ashtikar) यांच्यावर तीन महिलांनी अचानक त्यांच्या दिशेने धाव घेत शाई (Ink) फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनाचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा (Ravi Rana) यांच्यावर (Attempted Murder) 307 कलमान्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राजापेठ उड्डाणपुलावर विनापरवानगी स्थापित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा पुतळा हटविल्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला असल्याची चर्चा आहे. ‘आम्ही समस्त शिवप्रेमी’ आणि यावा स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी 12 जानेवारी रोजी राजापेठ उड्डाणपुलावर शिवरायांचा पुतळा बसविला होता. महापालिकेने 16 जानेवारीच्या मध्यरात्री हा पुतळा हटवून ताब्यात घेतला. तेव्हापासून आमदार रवि राणा (Ravi Rana) विरुद्ध प्रशासन असा वाद पेटला आहे. ही बाब आमदार रवि राणा यांच्या जिव्हारी लागल्याने त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Guardian Minister Yashomati Thakur), महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, भाजप (BJP) गटनेते तुषार भारतीय (Tushar Bharatiya)आदींना लक्ष्य केले. याप्रकरणी आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीच्या हल्ल्यानंतर रवि राणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले रवि राणा?
यासंदर्भात रवि राणा यांनी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी दिल्लीत होतो. मीही माध्यमातून हे वृत्त ऐकले आहे. शिवप्रेमींच्या भावना दुखावल्यामुळे त्यांनी आयुक्तांच्या अंगावर शाईफेक केल्याचं राणा यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री (CM), गृहमंत्री (HM) आणि पालकमंत्री यांच्यावरील दबावामुळेच आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला काही पोलीस व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. राजकीय सूडबुद्धीने मला अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचेही राणा यांनी म्हटले. विशेष म्हणजे एका सुईचादेखील कुठे पुरावा मिळत नाही, पण 307 चा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राणा यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

5 जण ताब्यात
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीनुसार राजापेठ पोलिसांनी 10 जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले आहे.
यात अजय बोबडे (Ajay Bobade), सूरज मिश्रा (Suraj Mishra), संदीप गुल्हाने (Sandeep Gulhane),
महेश मुलचंदानी (Mahesh Mulchandani), विनोद येवतीकर (Vinod Yevtikar) यांना ताब्यात घेतले आहे.
कमलकिशोर मालाणी (Kamal Kishor Malani) यांची प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहेत.
तीन महिला व एक पुरुष असे चार जण फरार आहे. याप्रकरणी भादंवि 307,353,120(ब),143,147,148,149 व आयटी अ‍ॅक्टनुसार (IT Act) 501,502 अन्वये गुन्हे दखल करण्यात आले आहे.

स्क्रू डायव्हरने केला हल्ला – आयुक्त
आमदार रवि राणा येणार असल्याचे कमलकिशोर मालानी यांनी सांगितल्यानेच तेथे गेलो होते.
या व्यक्तींनी माझ्या शासकीय वाहनांची दोन चाके स्क्रू ड्रायव्हरने फोडली व माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
चालकाने कशीतरी गाडी घरापर्यंत आणली. या धक्काबुक्कीत माझ्या शर्टाची दोन बटणे तुटली.
नैतिक खच्चीकरण करण्याचा हा प्रकार असल्याचे आयुक्तांनी एका वेबसाईटला सांगितले.

Web Title :- Ravi Rana | ravi rana mla becomes absconding ravi rana charged with attempted murder 307 in amravati

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील 24 वर्षीय लष्करी जवानाची आत्महत्या, पत्नी व सासरच्या लोकांवर FIR

IPS Krishna Prakash | पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची ‘पोलीसनामा’च्या कार्यालयास सदिच्छा भेट

Pune Crime | दारु पिण्यास पैसे न दिल्याने टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; सराईत गुंडाची जनता वसाहतीत दहशत?

Related Posts