IMPIMP

Ravi Rana | ‘ठाकरे सरकार पडणार, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार’ – आमदार रवी राणा

by nagesh
Ravi Rana | Thackeray government will fall presidential rule will be implemented in Maharashtra MLA Ravi Rana

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाइनRavi Rana | महाविकास आघाडी सरकारमधील मंंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यांनी दाऊदसोबत मनी लॉन्ड्रिंग केल्या प्रकरणी ताब्यात घेतलं आहे. 3 मार्चपर्यंत नवाब मलिकांना (Nawab Malik) ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. अशातच आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार (Thackeray government) पडणार असल्याचा दावा केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहिलेली नाही. राज्यात राष्ट्रपती शासन (Presidential Rule) लागेल अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल तर हे सरकार पाडावं लागेल. वेळ पडली तर राष्ट्रपती शासन लावावं लागेल. त्यासोबतच जे – जे मंत्री घोटाळेबाज आहेत त्यांना तुरूंगात टाकावं लागेल, असं रवी राणा (Ravi Rana) यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकार पाडण्याची गरज नाही कारण हे सरकार तिन तिघाडी सरकार आहे. यांच्यात कोणालाच कोणाचा मेळ नाही.
सरकारमधील जे नेते गजाआड गेले आहेत आणि काही जाण्याच्या तयारीमध्ये आहेत त्याच्यावरून असं वाटतं की या पक्षातील काही राजकीय नेतेच हे सरकार बरखास्त करतील,असं म्हणत रवी राणा यांनी सरकारवर निशाणा साधला.
यावेळी बोलताना राणा यांनी शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावरही टीका केली.

दरम्यान, येत्या काही दिवसात अनिल परब हे ही तुरूंगात जाण्याच्या तयारीत आहेत.
कारण त्यांची फाईल आणि चौकशी (Inquiry) आता पुर्ण झाली असल्याचं राणा यांनी सांगितलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ravi Rana | Thackeray government will fall presidential rule will be implemented in Maharashtra MLA Ravi Rana

हे देखील वाचा :

Dearness Allowance | मूळ पगारावर किती मिळेल DA? जाणून घ्या

Malaika Arora Trolled Video | घरातून विचित्र कपड्यांमध्ये निघाली मलाइका अरोरा… नेटकरी म्हणले – ‘हे पोत कुठून उचलून आणलं?’

Multibagger Stocks | 5 रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, 1 लाख झाले 1.7 कोटी

Sachin Tendulkar | जुगाराच्या प्रमोशनसाठी क्रिकेटच्या देवाचा वापर; संतापलेल्या सचिनने उचलंलं ‘हे’ मोठं पाऊल!

Related Posts