IMPIMP

Raw Milk | कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी लाभदायक की नुकसानकारक? जाणून घ्या काय आहे सत्य

by nagesh
Raw Milk | drinking raw milk side effects boiled food poisoning animal products harmful or beneficial

सरकारसत्ता ऑनलाइन –  Raw Milk | दुधाला पूर्ण अन्न मानले जाते कारण त्यात जवळजवळ सर्व प्रकारचे पोषक घटक आढळतात, म्हणूनच
बहुतेक आरोग्य तज्ञ (Health Expert) चांगल्या आरोग्यासाठी त्याचे सेवन करण्याची शिफारस करतात. दुधाचा वापर अनेक प्रकारे केला जातो, काही
लोक ते थेट पितात किंवा डेअरी प्रॉडक्ट खाऊन देखील या सुपरफूडचा लाभ घेऊ शकतात (Raw Milk Side Effects).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दूध कच्चे प्यावे की उकळलेले?
जेव्हा थेट दूध (Milk) पिण्याबद्दल बोलले जाते, तेव्हा सर्वाधिक चर्चा होते की दूध कच्चे प्यावे की उकळून? याबाबत सत्य आज जाणून घेवूयात…

कच्चे दूध प्यायल्यास काय होते?
सत्य हे आहे की कच्चे दूध प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचते. अन्न आणि औषध प्रशासन, यूएस (Food and Drug Administration) आरोग्य संरक्षण एजन्सीनुसार, कच्च्या दुधामध्ये एस्चेरिचिया कोलाए (E. coli) आणि लिस्टेरिया (Listeria), साल्मोनेला (Salmonella) इत्यादीसारखे अनेक हानिकारक जीवाणू असू शकतात. कच्चे दूध प्यायल्याने अन्न विषबाधा होऊ शकते.

कच्चे दूध पिण्याचे साईड ईफेक्ट
कच्च्या दुधात असलेले बॅक्टेरिया (Bacteria) आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात ज्यामुळे अतिसार, संधिवात आणि डिहायड्रेशन (Dehydration) सारख्या समस्या उद्भवतात, त्याच्या सेवनाने शरीरातील अ‍ॅसिडचे प्रमाण देखील वाढते जे आरोग्यासाठी चांगले नाही.

कच्च्या दुधात असू शकते घाण
कच्चे दूध पिणे हानिकारक आहे कारण जनावराचे दूध काढल्यावर कास दूषित असू शकते, त्याशिवाय जर यासाठी स्वच्छ हात आणि स्वच्छ भांडी वापरली नाहीत तर दुधात घाण येऊ शकते. म्हणूनच हे आवश्यक आहे की आपण दूध उकळल्यानंतरच प्यावे, ज्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Raw Milk | drinking raw milk side effects boiled food poisoning animal products harmful or beneficial

हे देखील वाचा :

Har Ghar Tiranga | जिल्हा परिषद परिसरात तिरंगा ध्वज विक्री केंद्राचा शुभारंभ

Soup and Salad | ‘सूप आणि सलाड’चे अशाप्रकारे करू नका सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान

Deepak Kesarkar | राणेंकडून आदित्यची बदनामी, उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते; दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

Related Posts