IMPIMP

RBI Action On Co-Op Banks | RBI ची कडक कारवाई ! आता महाराष्ट्रातील 3 बँकांसह ‘या’ 8 को-ऑपरेटिव्ह बँकांना दणका, ठोठावला लाखो रूपयांचा दंड

by nagesh
RBI Action On Co-Op Banks | rbi penalises eight co operative banks on non compliance with various banking norms

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRBI Action On Co-Op Banks | बँकिंग नियमांचे (Banking Rules) योग्य पालन न केल्यामुळे, आरबीआय (Reserve Bank Of India) अनेकदा बँकांवर कारवाई करत असते. अलीकडच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकने विशेषत: सहकारी बँकांबाबत (Co-operative Banks) कठोर भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर आता रिझर्व्ह बँकेने आठ सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. बँकिंगच्या काही तरतुदींचे पालन न केल्यामुळे या सहकारी बँकांना 40 लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात आला आहे. (RBI Action On Co-Op Banks )

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निर्देशांचे उल्लंघन केल्याने महाराष्ट्रातील इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 7 लाख रुपयांचा दंड, तर केवायसी नियमाचे पालन न केल्याने वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वरुड आणि यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र, या कारवाईचा बँका आणि ग्राहकांमधील व्यवहाराशी काहीही संबंध नाही असे आरबीआयने म्हटले आहे.

सेंट्रल बँकेने ठोठावला इतका दंड

रिझर्व्ह बँकेने सोमवारी सांगितले की, मेहसाणा को-ऑपरेटिव्ह बँकेला (Mehsana Urban Co-operative Bank, Gujarat) सर्वाधिक 40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मेहसाणा को-ऑपरेटिव्ह बँकेने ठेवींवरील व्याज दराबाबत सहकारी बँकांसाठी 2016 मध्ये जारी केलेल्या निर्देशांपैकी एकही नियम पाळली नाही. यामुळे सेंट्रल बँकेने त्यांना 40 लाखांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला. सेंट्रल बँकेने एका स्वतंत्र निवेदनात म्हटले आहे की, इंदापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला (Indapur Urban Cooperative Bank, Indapur, Maharashtra) माहिती देण्यासंबंधीच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने 7 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. (RBI Action On Co-Op Banks)

केवायसी तरतुदींचे उल्लंघन पडले महागात

रिझर्व्ह बँकेने सांगितले की वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, वरुड, महाराष्ट्र (Warud Urban Co-operative Bank, Warud, Maharashtra), जिल्हा सहकारी सेंट्रल बँक मर्यादित, छिंदवाडा, मध्य प्रदेश (Jila Sahakari Kendriya Bank Maryadit, Chhindwara, Madhya Pradesh) आणि यवतमाळ नागरी सहकारी बँक, यवतमाळ, महाराष्ट्र (Yavatmal Urban Co-operative Bank, Yavatmal, Maharashtra) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी दोन बँका वरुड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक या महाराष्ट्रात आहेत, तर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे आहे. केवायसी (KYC) संबंधित तरतुदींचे योग्य पालन न केल्यामुळे या तीन सहकारी बँकांवर कारवाई करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या तीन सहकारी बँका सुद्धा निशाण्यावर

याशिवाय, केवायसीच्या अनेक तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल छत्तीसगड राज्य सहकारी बँक मर्यादित, रायपूर (Chhattisgarh Rajya Sahakari Bank Maryadit, Raipur) ला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँकेने गुना येथील गढ को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मध्य प्रदेश (Garha Co-operative Bank Limited, Madhya Pradesh)
आणि गोवा राज्य सहकारी बँक, पणजी (Goa State Co-operative Bank, Panaji) यांच्यावरही कारवाई केली आहे.
सेंट्रल बँकेने म्हटले आहे की, या आठ बँकांवर कारवाईचा अर्थ असा आहे की त्यांनी बँकिंग तरतुदींचे योग्य पालन केले नाही.
बँका आणि त्यांचे ग्राहक यांच्यातील कोणत्याही व्यवहाराचा याच्याशी संबंध नाही.

गेल्या महिन्यात या दोन बँकांवर कारवाई

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, सेंट्रल बँकेने उत्तर प्रदेशातील लखनौ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक (Lucknow Urban Co-operative Bank)
आणि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, सीतापूर (Urban Co-operative Bank Limited, Sitapur) यांच्यावर कारवाई केली होती.
ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे या दोन बँकांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला.
या दोन सहकारी बँकांवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लागू आहेत.
या अंतर्गत लखनऊ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे ग्राहक 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत.
त्याचप्रमाणे अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या ग्राहकांना 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : – RBI Action On Co-Op Banks | rbi penalises eight co operative banks on non compliance with various banking norms

हे देखील वाचा :

Pune Crime | परदेशात नोकरीच्या आमिषाने महिलेने 10 जणांना फसवलं, समर्थ पोलिस ठाण्यात FIR

Maharashtra Cabinet Expansion | मंत्रीमंडळ विस्तारात पुण्याला एक मंत्रीपद, चंद्रकांत पाटलांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, इतरांना संधी नाही?

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारकडून ‘दे धक्का’; आज शपथ घेणारे 18 कॅबिनेट मंत्री, संजय शिरसाट यांचा पत्ता कट ?

Related Posts