IMPIMP

RBI Hike Repo Rate | सणासुदीपूर्वी RBI चा पुन्हा झटका, रेपो रेट 0.50 टक्के वाढला, कर्ज महागले

by nagesh
RBI | kyc process how to video kyc online at home rbi issue guidlines

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – RBI Hike Repo Rate | आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. मध्यवर्ती बँकेने (Central Bank) पॉलिसी
व्याजदरात (Policy Interest Rate) 50 आधार अंकांची वाढ केली आहे. यासाह रेपो दर 5.90 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो तीन वर्षांतील उच्चांक
आहे. आरबीआय बँकांना ज्या दराने कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर. या वाढीमुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग (RBI Hike Repo Rate)
होणार आहेत. रेपो दरात वाढ करण्याचा निर्णय सेंट्रल बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (Monetary Policy Committee (MPC) बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास (Governor Shaktikanta Das) यांनी दिली. मे महिन्यापासून रेपो दरात 1.90 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कर्ज घेण्याचा खर्च महागणार

रेपो दरात वाढ केल्याने कर्ज (Loan) घेण्याच्या खर्चात वाढ होईल. कारण रेपो दरात वाढ (RBI Hike Repo Rate) झाल्याने बँकांच्या कर्ज खर्चात वाढ होईल. बँका ते ग्राहकांना देतील आणि त्यामुळे कर्ज घेणे महागणार आहे. याचा परिणाम घरांच्या विक्रीवरही (Home sale) होणार आहे. कच्चा मालाच्या किमतीत वाढ झाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी (Builders) आधीच स्थावर मालमत्तेच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे रिअल इस्टेट बाजाराच्या (Real Estate Market) पुनर्प्राप्ती वर परिणाम होईल जे आताच ट्रॅवर परत आले आहे.

गृहकर्जावर असा होणार परिणाम

बँका देऊ करत असलेली नवीन किरकोळ कर्जे एक्सटर्नल बेंचमार्कशी (External Benchmark) जोडलेली असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, ते रेपो दराशी जोडलेले असते. त्यामुळेच रेपो दरात कोणताही बदल केल्यास गृहकर्जाच्या व्याजदरावर परिणाम होतो. म्हणजेच रेपो रेट वाढल्याने तुमच्या गृहकर्जाचा हप्ता (Home Loan Installment) वाढेल. तसेच MCLR, बेस रेट आणि BPLR शी जोडलेल्या जुन्या गृहकर्जांवरही त्याचा परिणाम होईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

EMI वाढणार

एखाद्या व्यक्तीने एप्रिल 2022 मध्ये 6.95 टक्के व्याजाने 20 वर्षासाठी 30 लाख रुपये गृहकर्ज घेतले असेल,
तर त्याचा हप्ता आता 8.35 टक्के दराने 25,751 रुपये होईल.
रेपो दरात वाढ झाल्यानंतर बँकेने कर्जदरात 25 बेसिस पॉईंटने वाढ केल्यास व्याजदर 8060 टक्क्यापर्यंत पोहोचेल.
त्यामुळे त्याचा हप्ता 26,225 रुपये होईल.
त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने एप्रिल 2022 मध्ये 1 कोटी रुपयांचे गृहकर्ज 6.9 टक्के व्याजाने 20 वर्षासाठी
घेतले असले, तर त्याचा हप्ता 76,931 रुपये असेल.
मात्र रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंट्सने वाढ केल्यानंतर तो 87,734 रुपये होईल.

Web Title :- RBI Hike Repo Rate | rbi monetary policy repo rate increase Marathi news

हे देखील वाचा :

Pune PMC News | आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांचे हिलटॉप हिलस्लोपवरील इमारतीत बेकायदा पुर्नवसन; महापालिकेने इमारतीच्या मालकाला बजावली नोटीस : रविंद्र बिनवडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

Pune Crime | माजी नगरसेवक दीपक मिसाळ यांना धमकावुन खंडणी मागणार्‍याने तरुणीचे अश्लिल फोटो व्हायरल करुन केली बदनामी

Related Posts