IMPIMP

RBI | आरबीआयकडून महाराष्ट्रातील ‘या’ बँकेला 90 लाखांचा दंड

by nagesh
RBI | rbi going to make big announcement big profit will be given on fixed deposit know how

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन सहकारी बँकांवर मंगळवारी (दि.26) कारवाई केली. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) एका सहकारी बँकेचा (Co-operative Bank) समावेश आहे. आरबीआयने पंजाबमधील नागरीक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि महाराष्ट्रातील वसई विकास सहकारी बँक (Vasai Vikas Sahakari Bank) यांना आर्थिक दंड केला आहे. निर्देशांचे पालन न केल्याने आरबीआयने (RBI) ही कारवाई केली. वसई विकास सहकारी बँकेला 90 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर पंजाबमधील बँकेला एक कोटीचा दंड ठोठावला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यामध्ये बुडित कर्ज (NPA) म्हणून वर्गीकरण आणि अन्य काही सूचनांचा समावेश आहे. तसेच नागरी सहकारी बँकेला उत्पन्नाची ओळख, मालमत्तेचे वर्गीकरण,
तरतूद या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 7 लाख रुपयांचा दंड केला आहे.

यामुळे केला दंड

आरबीआयने (RBI) एका निवेदनात म्हटले की, बँकेने कर्ज खात्यातील (loan account) निधीचा वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि कर्जामार्फत
अनुत्पादित मालमत्ता किंवा एनपीए म्हणून वर्गीकरण करण्याच्या सूचनांचे पालन केले नाही.
बँक खाते आणि नफा-तोटा खात्याच्या (Profit-loss account) पुस्तकांवर किमीन तीन संचालकांनी स्वाक्षरी केली पाहिजे.
हे सुनिश्चित करण्यासाठी आरबीआयच्या विशिष्ट निर्देशांचे देखील बँकेने पालन केलेलं नाही.

31 मार्च 2019 रोजी बँकेची वैधानिक तपासणी, तिचा अहवाल आणि बँकेच्या आर्थिक स्थितीशी संबंधित सर्व पत्रव्यवहार तपासल्यानंतर हा खुलासा झाला आहे.
असे आरबीआयच्या निवेदनात म्हटले आहे.

Web Title : RBI | rbi charges fine to vasai cooperative bank and punjab urban cooperative bank fine

हे देखील वाचा :

Pune Crime | शाळेत केलेल्या कृत्याचा 16 वर्षांनी घेतला ‘असा’ बदला, पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Forest caught leopard | तब्बल 17 तासानंतर पुण्याच्या हडपसर परिसरातील बिबट्या अखेर जेरबंद

former Indonesian President Sukarno | इण्डोनेशियाचे संस्थापक राष्ट्रपती सुकर्णो यांची कन्या इस्लाम सोडून स्वीकारणार हिंदू धर्म, जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्येचा देश

Related Posts