IMPIMP

Remo D’Souza | रेमो डिसूझाच्या कुटुंबातील सदस्याची आत्महत्या, संपूर्ण कुटुंबला मोठा धक्का

by nagesh
Remo D'Souza | jason watkins brother in law of remo dsouza committed suicide by hanging himself

सरकारसत्ता ऑनलाइन – Remo D’Souza | प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि फिल्ममेकर रेमो डिसूझा ( Remo D’Souza ) यांचा मेहुणा जेसन
वॅटकिन्सने (Jason Watkins) आत्महत्या केली. जेसन वॅटकिन्सचा मृतदेह मुंबईतील मिल्लत नगर येथील त्याच्या घरी आढळून आला. मिळालेल्या
माहितीनुसार, त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. जेसन हा रेमा डिसूझाची पत्नी लिझेल (Lizelle Remo D’Souza) हिचा भाऊ होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रकरणाची पुष्टी करताना पोलिसांनी सांगितले की, जेसन वॅटकिन्सचा मृतदेह त्याच्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी सांगितले की, मृतदेह विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून जेसनची तब्येत बिघडल्याचे समजते. नैराश्य हे त्याच्या आत्महत्येचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

यावर रेमोच्या ( Remo D’Souza ) बाजूने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. लिझेलनेही याबाबत थेट कोणतीही माहिती दिलेली नाही, मात्र तिने तिच्या भावाचे काही फोटो शेअर केले असून अतिशय भावूक गोष्टी लिहिल्या आहेत.

रेमो डिसूजाची पत्नी लिझेल रेमो डिसूझा हिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचा भाऊ आता या जगात नाही, असे पोस्ट करताना तिने लिहिले आहे. भाऊ जेसनचे फोटो शेअर करत तिने लिहिले- ‘का? तू माझ्यासोबत असं का केलंस? मी तुला कधीच माफ करणार नाही.’ (Lizelle Remo D’Souza’s Brother’s Suicide )

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : Remo D’Souza | jason watkins brother in law of remo dsouza committed suicide by hanging himself

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात वाढ तर, चांदी घसरली; जाणून घ्या आजचा भाव

Responsibilities Of WhatsApp Group Admin | जर तुम्ही सुद्धा असाल एखाद्या WhatsApp ग्रुपचे अ‍ॅडमिन तर ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा जावे लागेल जेलमध्ये

SBI Tax Saving Scheme | 5 लाख जमा करा, मॅच्युरिटीवर मिळतील 6.53 लाख; सोबतच टॅक्स सवलतीचा फायदा

Related Posts