IMPIMP

Restrictions in Maharashtra | राज्यात निर्बंध वाढणार? अजित पवारांनी सांगितलं…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar in pune talk about health

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Restrictions in Maharashtra | मागील दोन वर्षाच्या कोरोनाच्या (Coronavirus) दोन्ही लाटेनंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. राज्यात दैनंदिन कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. राज्यातील कोरोनाच्या आकड्यापैकी मुंबईत (Mumbai) कोरोना बाधितांचा आकडा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध वाढवण्याबाबत (Restrictions in Maharashtra) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यावेळी पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘कोरोनाबाबत मुंबईत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होणार आहे. त्यातील चर्चेनंतर निर्बंध वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल,’ असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. ‘निर्बंधाचा निर्णय असा लगेच घेतला जात नाही. त्यावर चर्चा होईल. मंत्री आपली भूमिका स्पष्ट करतील. आरोग्यमंत्री माहिती देतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर चर्चा होईल. मगच काय तो निर्णय घेतला जाईल. नागरिकांना त्रास होऊ नये याचबरोबर काळजी घेणेही गरजेचे आहे. केंद्र सरकारने (Central Government) निर्णय घेतला, आता काय करायचे ते राज्य सरकार (Maharashtra Government) ठरवेल.’ असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. (Restrictions in Maharashtra)

पुढे अजित पवार म्हणाले, ‘लसीकरण (Vaccination) व्यवस्थित सुरू आहे. काही ठिकाणी ते कमी पडले असे समजते आहे. त्याची चौकशी करून तिथे पुरवठा केला जात आहे. सर्वांचे लसीकरण व्हावे यादृष्टिने नियोजन करण्यात येत आहे. याचा आढावा संबधित खाते, मंत्री यांच्याकडून वारंवार घेतला जात आहे,’ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Restrictions in Maharashtra | will restrictions increase maharashtra what exactly did ajit pawar said

हे देखील वाचा :

Pune Crime | एटीएम मशिन देण्याच्या बहाण्याने पुण्यातील नागरिकाची फसवणूक, 3 जणांवर FIR

Gold Price Today | सोन्याची घसरण सुरूच, चांदीची चमक सुद्धा उतरली, जाणून घ्या आजचा नवीन दर

PNB Job | पंजाब नॅशनल बँकेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! ‘या’ पद्धतीने होणार निवड; जाणून घ्या सविस्तर

Related Posts