IMPIMP

Ricky Ponting Feeling Unwell | रिकी पाँटिंग रुग्णालयात दाखल, काॅमेंट्री करत असताना अचानक बिघडली तब्येत

by nagesh
Ricky Ponting Feeling Unwell | ricky ponting feeling unwell admitted in hospital

पर्थ : वृत्तसंस्था – Ricky Ponting Feeling Unwell | ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि फलंदाज रिकी पाँटिंग याची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पर्थमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान काॅमेंट्री करत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समोर आले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रिकी पाँटिंग चॅनेल 7 साठी काॅमेंट्री करतात. वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थवर सुरू असलेल्या कसोटी सामन्यातही ते काॅमेंट्री पॅनेलमध्ये होते. जेव्हा या सामन्याच्या दरम्यान लंच ब्रेक झाला तेव्हाच पाँटिंग यांनी काॅमेंट्री रूम सोडली. यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर आले.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकच्या दरम्यान पाँटिंग यांच्या छातीत दुखू लागले होते.
त्यांनी आपल्यासोबत काम करत असलेल्या लोकांना सांगितलं की, त्यांना बरं वाटत नाही.
त्यांना रुग्णालयात जायचं आहे.
त्यांनी असं सांगताच वैद्यकीय टीम तिथे पोहोचली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे आजच्या उर्वरित कव्हरेजसाठी ते काॅमेंट्री करू शकणार नाहीत, असे चॅनेल 7 च्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.

Web Title :- Ricky Ponting Feeling Unwell | ricky ponting feeling unwell admitted in hospital

हे देखील वाचा :

Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबिन नौटियाल रुग्णालयात दाखल; डोक्याला झाली गंभीर दुखापत

MPSC Exam | PSI पदांची निवड यादी आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादी केली झटपट जाहीर

Pune Pimpri Crime | विवाहेच्छुक महिलेची 12 लाखांची फसवणूक; चिखली परिसरातील घटना

Related Posts