IMPIMP

Rohit Pawar | ‘पण त्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता गहाण टाकायची का?’; राज्य सरकारला रोहित पवारांचा प्रश्न

by nagesh
Rohit Pawar | ncp mla rohit pawar tweet where did the threats go rohit pawars tweet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- गेले अनेक दिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच तापला होता, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय नाटक सुरू झाले होते. त्यात सर्व विरोधी पक्षांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर हे प्रकरण बऱ्यापैकी शांत झाले होते. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पुन्हा या मुद्द्यावरून शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांचा कर्नाटक दौरा टळल्यामुळे सरकारवर हल्ला चढविला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई सीमाप्रश्नासंबंधी कर्नाटक दौरा करणार होते. पण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे वक्तव्य केले. त्यानंतर सदर आशयाचे पत्र कर्नाटकाच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवले. या घटनेचा संदर्भ घेत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला. सर्व घटनाक्रमाला येणाऱ्या कर्नाटक निवडणुकांशी जोडून महाराष्ट्राचे मंत्री कर्नाटकाच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान धुळीस मिळवत आहेत, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला. ते लिहितात, ‘देशात महाराष्ट्राची आदरयुक्त भीती असताना आज शेजारच्या मुख्यमंत्र्यांनी दम देताच आपले मंत्री दौरा रद्द करतात. इतकी लाचारी का आणि कोणासाठी? आगामी निवडणुका बघता अशा भूमिका घेण्यासाठी दबाव असेलही, पण त्यासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेची किंमत मोजणं आणि स्वाभिमान गहाण टाकणं योग्य नाही.’

ते म्हणाले, ‘सत्तेच्या धुंदीत असलेल्या सरकारला याचा विसर पडलेला दिसतो.
दुसरीकडं महाराष्ट्रात भर कार्यक्रमात गोळीबार करणारे, शिवीगाळ करणारे, महिलांविषयी अपशब्द वापरणारे,
‘चुनचून के’ मारण्याची आणि ‘अरे ला कारे’ने उत्तर देण्याची भाषा करणारे आता गेले कुठं?
असाही प्रश्न यानिमित्ताने पडतो.’ महाराष्ट्रात घडलेल्या घटनांचा आधार घेऊन,
नको तिथे हिंमत दाखवणारे सरकारचे नेते यावेळी कुठे गायब झाले, असा प्रश्नही त्यांनी केला.
तर, महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमांमुळे कर्नाटक दौरा पुढे ढकलला आहे, असे महाराष्ट्र सरकारचे म्हणणे आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rohit Pawar | ncp mla rohit pawar tweet where did the threats go rohit pawars tweet

हे देखील वाचा :

Pune Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा सपासप वार करून खून; इंजिनिअर पती गजाआड, हडपसर परिसरातील घटना

Maharashtra Government Holidays | नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना 24 सार्वजनिक सुट्ट्या; अजित पवार मात्र नाराज, जाणून घ्या

Chandrashekhar Bawankule | ‘ठाकरेंनी काँग्रेसच्या घटनेची झेरॉक्स काढून ती आपल्या पक्षाची म्हणून जाहीर करावी’ – चंद्रशेखर बावनकुळे

Related Posts