IMPIMP

Rohit Pawar Vs Jayant Patil | रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील वाद शरद पवारांची डोकेदुखी ठरणार? राष्ट्रवादीत धुसफूस

by sachinsitapure

बारामती: Rohit Pawar Vs Jayant Patil | लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election) मुंबईतील काही भागात ‘लोकसभा निवडणुकीतील किंगमेकर जयंत पाटील’ अशा आशयाचे पोस्टर लागले होते. यावर टीका करताना रोहित पवार यांनी जयंत पाटील यांचा सभेत खरपूस समाचार घेतला. कुठेतरी लोकसभा निवडणुकीत आपणच किंगमेकर आहोत अशा शब्दात श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र तसं नाही हे म्हणताना जयंत पाटील यांच्याकडे निर्देश केल्याचे पाहायला मिळालं होतं.

लोकसभा निवडणुकीत यश मिळण्यापूर्वी सातत्याने रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून रोहित पवार यांना पक्ष संघटनेत जबाबदारी दिली गेली पाहिजे अशी मागणी होती. मात्र अद्याप रोहित पवार यांना पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. यामागे कुठेतरी जयंत पाटील यांचा हात आहे असा संशय रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांना आहे.

नुकताच रोहित पवार यांच्या जवळचा कार्यकर्ता असणाऱ्या विकास लवांडे यांनी रोहित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेची जबाबदारी द्यावी. तर जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून शशिकांत शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पद द्यावे, अशी मागणी केली होती. त्यामुळेच आता रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील वाद शरद पवारांची (Sharad Pawar) डोकदुखी ठरणार असे म्हंटले जात आहे.

Related Posts