IMPIMP

Rohit Pawar : ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण…’

by nagesh
rohit pawar welcomed the decision to open religious places

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केले. ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, पण आज प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्याने नाईलाजाने हा निर्णय घेतला आहे’, असे ते म्हणाले.

भाजपचं पितळ उघडं पाडण्यासाठी काँग्रेसकडून यू-ट्यूब चॅनल लाँच

‘ब्रेक दी चेन’ या अंतर्गत राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, यावर रोहित पवार Rohit Pawar यांनीही ट्विट करत आपले म्हणणे मांडले. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘राज्यातील निर्बंधांचा अनेकांना त्रास होऊ शकतो, ‘पण आज प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा असल्याने नाईलाजाने हा निर्णय घेतला असून अन्य राज्यांतही असाच निर्णय घेतला जाईल, अशी स्थिती आहे,’ हे ध्यानात घ्यावं! या काळात एकमेकांना सहकार्य करुयात, कोरोना विषाणूची साखळी तोडूयात, असे ते म्हणाले.

‘डबल रोल’ ! एकीकडे मुलीची भूमिका निभावत असताना दुसरीकडे नेत्याची भूमिका पार पाडत आहेत सुप्रिया सुळे

‘शिवभोजन सेंटर सुरु कारण ते शिवसेना कार्यकर्त्यांचे, इतरांचे काय?’, निलेश राणेंचा सवाल

तसेच आजही प्रवासी मजूर गावांकडे निघाले असून, रेल्वेस्थानकांवर मोठी गर्दी झाली आहे. गतवर्षीच्या चुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांशी समन्वय साधत आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना द्याव्यात. राज्य शासनानेही प्रवासी मजुरांना फटका बसू नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पुन्हा तीच चूक झाली तर ती कामगारांसाठी आणि राज्यासाठीही नुकसानकारक ठरेल. शिवाय राज्य सरकारने संपूर्ण ‘लॉकडाऊन’ केलेला नाही तर काही कंपन्या, अनेक बांधकाम प्रकल्प यांना परवानगी दिली आहे, याचा विचार करून स्थलांतरित आणि स्थानिक कामगारांनी घरी जाण्याची घाई करू नये, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Also Read :

नाना पटोलेंचे फडणवीसांना प्रत्युत्तर, म्हणाले -‘फडणवीसांचे जर दिल्लीत वजन असेल तर…

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त; तब्बल 2.5 हजार पोलिस राहणार तैनात

चंद्रकांत पाटलांचे सरकार पाडण्याबाबत पुन्हा मोठं वक्तव्य; म्हणाले…

100 कोटींचे खंडणी प्रकरण : CBI कडून माजी ग्रहमंत्री अनिल देशमुखांची साडेआठ तास चौकशी

Related Posts