IMPIMP

Rule Change | 1 जुलैपासून बदलणार आहे SBI, RTO, TDS, Aadhar-PAN Card सह अनेक नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

by nagesh
Business Ideas | business ideas start your own business with take franchise and earn 80k monthly

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Rule Change | जुलै महिना तुमच्यासाठी अनेक बदल घेऊन येत आहे (New Rule From July), ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असल्यास, तुम्हाला एटीएम आणि चेक पेमेंटसाठी शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, डीएल बनवण्याची पद्धत देखील बदलेल आणि TDS दोनदा भरावा लागेल. याशिवाय आधार पॅन लिंक करण्यासाठी दुप्पट शुल्क आकारले जाईल. यासोबतच LPG गॅसच्या किमतीतही वाढ होऊ शकते. (Rule Change)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. आधार-पॅन कार्ड लिंक शुल्क
CBDT ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 1 जुलैपासून आधार कार्ड पॅनशी लिंक करण्यासाठी ग्राहकांना आता 500 रुपयांऐवजी 1000 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. जर तुम्ही तुमचे आधार-पॅन लिंकिंग (Aadhaar-PAN Linking) केले नसेल, तर ते लवकर करा. CBDT ने 29 मार्च 2022 रोजी अधिसूचना जारी केली होती.

2. बँकेचे शुल्क वाढले
स्टेट बँक ऑफ इंडियाने बेसिक सेव्हिंग डिपॉझिट अकाऊंटच्या शुल्कामध्ये विविध बदल केले आहेत. आता ग्राहकांना बँकेतून पैसे काढण्यासाठी आणि चेकद्वारे पैसे भरण्यासाठी नवीन सेवा शुल्क भरावे लागणार आहे. (Rule Change)

बेसिक सेव्हिंग डिपॉझिट अकाऊंटच्या ग्राहकांना महिन्यातून फक्त चार वेळा एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोफत व्यवहार मिळणार आहेत. यापेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला 15 रुपये प्लस जीएसटी भरावा लागेल.

याशिवाय, एसबीआय ग्राहक 10 पानांचा चेक वापर करू शकतो, जर अतिरिक्त चेक वापरले तर 10 अतिरिक्त चेकना 40 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल तर 25 चेकसाठी 75 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

3. वाढू शकतात LPG गॅस सिलिंडरच्या किमती
एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी वाढतात. अशा स्थितीत 1 जुलै रोजी घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

4. दुप्पट कापला जाईल जीएसटी
जर तुम्ही अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न भरलेला नसेल, तर आज आणि आत्ताच हे काम करा, अन्यथा तुमच्याकडून दुप्पट टीडीएस आकारला जाईल.

आयटीआर भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असली तरी,
ज्यांची टीडीएस रक्कम 50 हजार रुपये किंवा त्याहून जास्त आहे आणि त्यांनी दोन वर्षांपासून आयटीआर दाखल केलेला नसेल,
अशा लोकांचे आता 1 जुलैपासून टीडीएस 10 ते 15 टक्के कापला जाईल. पूर्वी हा हिस्सा 5 ते 10 टक्के होता.

5. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही
शिकाऊ वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी 1 जुलैपासून कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही.
तुम्हाला नोंदणीकृत प्रशिक्षण शाळेतून प्रशिक्षण घ्यावे लागेल. सखोल प्रशिक्षणानंतर तुम्हाला डी.एल. मिळेल.

6. नवीन IFSC कोड
कॅनरा बँकेच्या विलीनीकरणानंतर आता सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना नवीन IFSC कोड जारी केला जाईल.
NFTTGS आणि IMPS द्वारे फंड प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना नवीन IFSC कोड वापरावा लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rule Change | many rules including sbi rto tds and aadhar pan card link are going to change from july 1 2022

हे देखील वाचा :

Mumbai Chembur Accident | रस्ता ओलांडताना भरधाव टँकरची धडक; चिमुकल्या बहिण-भावाचा मृत्यू, परिसरात हळहळ

Jayant Patil | राज्यात राजकीय संकट! जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य; म्हणाले…

Currency Printing Rate List | RTI मध्ये खुलासा, 10 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंतच्या नोटांच्या छपाईचा रेट

Related Posts