IMPIMP

Rules Change From 1st June | 1 जूनपासून बँकिंग, विमा, एलपीजीच्या दरासह ‘या’ 11 मोठ्या बदलांचा तुमच्या खिशावर होणार परिणाम; जाणून घ्या

by nagesh
Rules Change From 1st June | rules change from june 1 these 11 big changes including banking pf insurance lpg price will affect your pocket

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRules Change From 1st June | 1 जूनपासून विमा (Insurance), बँकिंग (Banking), PF, एलपीजी सिलिंडरची किंमत (LPG Gas Cylinder Price), आयटीआर फाइलिंग (ITR Filing), गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking), छोट्या बचतीवरील व्याज (Interest On Small Savings Scheme) अशा अनेक योजनांचे नियम बदलत आहेत. काही बदल 1 जूनपासून तर काही 15 जूनपासून होतील. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. असे कोणते बदल आहेत ज्यामुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो ते जाणून घेऊया… (Rules Change From 1st June )

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. PMJJBY आणि PMSBY चे प्रीमियम दर वाढले
केंद्र सरकारने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय) च्या प्रीमियममध्ये वाढ केली आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा प्रीमियम दर 330 रुपयांवरून 436 रुपयांपर्यंत वाढला आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे. हे नवीन प्रीमियम दर 1 जून 2022 पासून लागू झाले आहेत.

2. 1 जूनपासून ज्वेलर्सवर ही बंधने
हे दागिने आमच्या दुकानातील नाहीत, असे सांगून ज्वेलर मागे हटू शकणार नाहीत. त्यांना हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) पोर्टलवर दागिन्यांच्या विक्रीची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. नवीन प्रणालीनुसार, दागिने बनवणार्‍यापासून ज्वेलर आणि खरेदीदाराचे नाव, वजन आणि किंमत सर्वकाही पोर्टलवर नोंदवावे लागणार आहे. (Rules Change From 1st June )

3. थर्ड पार्टी व्हेईकल इन्शुरन्स : नवीन दर
महागाईचा फटका वाहनधारकांच्या खिशाला बसणार आहे. केंद्र सरकारने वाहनांच्या विविध श्रेणींसाठी थर्ड पार्टी मोटर विमा प्रीमियमचे दर वाढवले आहेत. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

4. अ‍ॅक्सिस बँकेने सेवा शुल्कात केली वाढ
अ‍ॅक्सिस बँके (Axis Bank) च्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अ‍ॅक्सिस बँकेने 1 जूनपासून सॅलरी आणि सेव्हिंग अकाऊंटवरील सेवा शुल्कात वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेने पुढील महिन्यापासून बचत खात्यातील किमान शिल्लक मर्यादा वाढवली आहे. याशिवाय बँकेने किमान शिल्लक नसल्यास लावल्या जाणार्‍या मासिक सेवा शुल्कातही वाढ केली आहे.

5. जीएसटी रिटर्नमध्ये विलंब झाल्यास जूनपर्यंत नाही शुल्क
सरकारने कंपोझिशन स्कीम अंतर्गत नोंदणीकृत लहान करदात्यांना 2021 – 22 या आर्थिक वर्षासाठी वस्तू आणि सेवा कर Goods and Services Tax (GST) रिटर्न भरण्यास उशीर झाल्यास सरकारने जूनपर्यंतचे दोन महिने विलंब शुल्क माफ केले आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) गुरुवारी एका अधिसूचनेत म्हटले आहे की 2021 – 22 या आर्थिक वर्षासाठी GSTR-4 भरण्यास विलंब झाल्यास 1 मे ते 30 जून 2022 पर्यंत विलंब शुल्क आकारले जाणार नाही.

6. पीएफचे नवीन नियम (PF New Rule)
तुम्ही नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ईपीएफओने भविष्य निर्वाह निधी (EPFO) खातेधारकांसाठीचे नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार, आता 1 जूनपासून मालकाला प्रत्येक कर्मचार्‍याचे खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

7. एसबीआयकडून गृहकर्ज घेणे महागणार
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या होमलोन एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटमध्ये 40 आधार अंकांनी 7.05% पर्यंत वाढ केली आहे, तर RLLR 6.65% प्लस क्रेडिट जोखीम प्रीमियम (CRP) असेल. वाढलेले व्याजदर 1 जूनपासून लागू होतील. त्यामुळे गृहकर्जाचे व्याजदर वाढतील. पूर्वी EBLR 6.65% होता, तर रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 6.25% होता.

8. एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल नाही (LPG Gas Cylinder Price)

नवीन महिन्यापासून म्हणजेच आजपासून एलपीजीच्या किमतीतही मोठा बदल झाला आहे. तेल कंपन्या दर महिन्याला एलपीजी सिलिंडरची घोषणा करतात. सध्या दिल्लीत 14.2 किलो गॅस सिलिंडरची किंमत 809 रुपये आहे आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत. अशावेळी आजपासून घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, तर व्यावसायिक सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

9. विमान प्रवास महागणार (Air Travel Will Be Expensive)
1 जूनपासून विमान प्रवास महाग होऊ शकतो. केंद्र सरकारने (Central Government) विमान प्रवास (Air travel) भाड्याची किमान कमाल मर्यादा 16 टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे.
विमान प्रवास भाड्याची कमाल मर्यादा 13 वरून 16 टक्के करण्यात आली आहे.
ही दरवाढ 1 जूनपासून लागू होणार आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एका आदेशात म्हटले आहे की, प्रवास भाड्याच्या वरच्या मर्यादेत कोणतीही वाढ केलेली नाही.
30 जून रोजी आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात येणार आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

10. अल्पबचत योजनेच्या व्याजदरात बदल
मार्चमध्ये पीपीएफ Public Provident Fund (PPF), एनएससी National Saving Certificate (NSC),
सुकन्या समृद्धी योजना Sukanya Samriddhi Yojana (SSY) यांसारख्या सरकारी योजनांचे व्याजदर बदल केला होता,
मात्र नंतर सरकारने ते चूक समजून ते मागे घेतले. यामुळे सरकारने निवडणुकीसाठी असे केले अशी टीका झाली होती.
हे दर 1 जून रोजी देखील बदलले जाऊ शकतात. मात्र, नवीन दर 30 जूनपर्यंत लागू आहेत.

11. बँक ऑफ बडोदा पेमेंट प्रोसेस (Bank of Baroda Payment Process)

बँक ऑफ बडोदा 1 जूनपासून चेक पेमेंटच्या नियमांमध्ये मोठे बदल करणार आहे.
बँक आजपासून ’पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन’ लागू करत आहे.
मात्र, ग्राहकांना सुविधा देताना बँकेने ’पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशन’ चा नियम 50 हजारांवरील पेमेंटवरच लागू होईल, असे म्हटले आहे.

बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आतापासून धनादेश जारी करणार्‍याला लाभार्थ्याची माहिती आगाऊ द्यावी लागेल.
यामुळे एकीकडे कमी वेळ लागेल, असे बँकेचे मत आहे. दुसरीकडे, चेक फसवणूक देखील टाळता येऊ शकते.

Web Title :- Rules Change From 1st June | rules change from june 1 these 11 big changes including banking pf insurance lpg price will affect your pocket

हे देखील वाचा :

Pune Crime | ज्ञानवापी मशिदीतील वादात भाजपा महिला प्रवक्त्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Pune Crime | शारिरीक संबंधाचा व्हिडिओ काढून ‘गे’ असल्याची बदनामी करण्याची धमकी; 24 वर्षाच्या तरुणाकडून उकळली खंडणी

Krishnakumar Kunnath – Singer KK | प्रसिद्ध गायक केके यांचे 53 व्या वर्षी निधन

Related Posts