IMPIMP

Rupali Patil Thombare | …. तर तुमचं घराबाहेर पडणं बंद करु, रुपाली पाटील ठोंबरे यांचा राणेंना इशारा

by nagesh
Rupali Patil Thombare | ncp leader rupali patil warns narayan rane over threatening sharad pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइननारायण राणे (Narayan Rane) यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याने शरद पवार (Sharad Pawar) साहेबांना पोकळ धमक्या (Threats) देऊ नयेत, तुम्ही आम्हाला घर गाठणं कठीण करताय, की आम्ही तुमचं घराबाहेर पडणं बंद करतो, हे बघा, असा इशारा राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी दिला आहे. तुम्ही बेडकासारखे आलात कुठून, त्या बेडकाने कडेकडेने निघायचं, अशा शब्दात रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी राणे यांचा समाचार घेतला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) म्हणाल्या, नारायण राणे यांनी शरद पवारांना धमकी दिली, त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही. बंडखोरांची मदत करायला आलेले नारायण राणे हे तुम्ही रचलेलं तर कुभांड आहे. तुमच्यावर ईडीची कारवाई होऊ नये, म्हणून तुम्ही स्वत: भाजपमध्ये (BJP) गेलात आणि आता धुतल्या तांदळासारखे असल्याप्रमाणे बोलताय. ज्या सत्तेपिपासू लोकांना ही सत्ता मिळवायची आहे, मी पुन्हा येईन चे झटके त्यांना येतात. त्यांनी महाराष्ट्रात हे रचून आणलंय, असा आरोप त्यांनी केला.

आम्ही आमच्या आमदारांशी काय बोलायचं हा आमचा प्रश्न आहे. यात राणे बेडकासारखे आले कुठून, त्या बेडकाने कडेकडेने निघायचं. गल्लीगल्लीत असलेल्या गुंडांचा कसा बंदोबस्त करायचा हे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चांगलेच माहित आहे. आम्ही आमचं घर गाठू की नाही, ते करुन दाखवा. परिस्थिती गंभीर असली तरी सरकार आणि शरद पवार खंबीर आहेत. त्यामुळे राणे सारख्या केंद्रीय मंत्र्यांनी पोकळ धमक्या देऊ नये. आणि ही त्यांची भूमिका आहे की पक्षाची आहे, ते एकदा सांगावं. मग आमचंही रक्त हिंदुत्वाचं, छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं आहे. आम्ही तुमचं घराबाहेर येणं बंद करतोय, हे पहा. तुमच्यासारखे गुंड भरपूर आहेत, पण शरद पवार एकच आहेत, जगातील वरिष्ठ नेते आणि तुम्हा सगळ्यांचा बाप आहेत, असा इशारा पाटील यांनी दिला.

काय म्हणाले होते राणे ?

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट शरद पवार यांना धमकी दिली आहे.
माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत.
ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार.
त्यांच्या केसालाही धक्का लागल्यास घर गाठणे कठिण होईल अशी धमकी त्यांनी पवारांना दिली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rupali Patil Thombare | ncp leader rupali patil warns narayan rane over threatening sharad pawar

हे देखील वाचा :

MPSC | राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा पद्धतीत बदल; MPSC चा मोठा निर्णय

Nitin Gadkari | आता भारतात होणार गाड्यांची क्रॅश टेस्ट, Bharat NCAP ला मंजुरी

Pune Crime | आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणातील दोन आरोपींना जामीन

Related Posts