IMPIMP

Rupee Slumps All Time Low | डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांकी पातळीवर; तुमच्या खिशाचे काय होईल? जाणून घ्या

by nagesh
Rupee Slumps All Time Low | rupee hits low against dollar know detail

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rupee Slumps All Time Low | देशांतर्गत शेअर बाजारातील (Stock Market) घसरणीमुळे रुपया विक्रमी पातळीवर पोहचला आहे. डॉलरच्या तुलनेमध्ये इंडियन डाॅलर (Indian Dollar) नीचांकी पातळीवर ट्रेड (Rupee Slumps All Time Low) करत आहे. त्याचबरोबर बुधवारी (22 जून) रोजी रुपया 19 पैशांनी घसरून अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये 78.32 रुपये प्रति डॉलर या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला आहे. परंतु, आज (गुरुवारी) सकाळी त्यामध्ये सुधारणा दिसली आणि तो 78.24 रु. प्रति रुपयावर सुरू झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विदेशी मुद्रा व्यापार्‍यांच्या माहितीनुसार, परदेशात डॉलरच्या मजबूतीमुळे रुपयाच्या भावावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये (International Market) कच्च्या तेलाच्या दरात घसरल्याने रुपयांचे नुकसान मर्यादित झाले आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारामध्ये, स्थानिक चलन डॉलरच्या तुलनेमध्ये 78.13 वर सपाटपणे उघडले आहे. गुरुवारच्या व्यवहार दरम्यान तो 78.13 चा उच्च आणि 78.40 चा विक्रमीच्या तुलनेत कमी होता. (Rupee Slumps All Time Low)

दरम्यान, काल (बुधवारी) 78.32 ची विक्रमी पातळी गाठली आहे. रुपया अखेरीस 78.32 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला आहे, मागील बंद किंमतीच्या तुलनेत 19 पैशांनी घसरला. गेल्या सत्रात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 78.13 वर बंद झाला होता. जतिन त्रिवेदी, उपाध्यक्ष, संशोधन विश्लेषक विभाग, LKP सिक्युरिटीजच्या माहितीनुसार, फेड रिझर्व्हने व्याजदर वाढवल्याचा परिणाम आहे. तसेच, “फेड रिझर्व्हच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (Investor) भारतीय बाजारपेठेत केलेल्या आक्रमक विक्रीमुळे रुपया 78.30 च्या खाली घसरला असल्याचं सांगितलं आहे.

परिणाम काय होईल?
रुपयाच्या विक्रमी नीचांकी पातळीवर गेल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांना होणार आहे.
यामुळे खिशाला कात्री लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारतीय चलनाच्या (Indian Currency) घसरणीचा सर्वात मोठा परिणाम आयातीवर होणार आहे.
भारतात आयात होणाऱ्या वस्तूंच्या दरात वाढ होईल. तसेच, देशात 80 टक्के कच्चे तेल (Crude Oil) आयात केले जाते,
म्हणजेच भारताला कच्च्या तेलासाठी जास्त किंमत मोजावी लागेल आणि परकीय चलन जास्त खर्च होईल.
अशा परिस्थितीत तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rupee Slumps All Time Low | rupee hits low against dollar know detail

हे देखील वाचा :

Sanjay Raut | 21 आमदारांशी संपर्क ! विजय महाविकास आघाडीचा असेल; संजय राऊतांच्या एकाचवेळी दोन भूमिका

Mahavikas Aghadi | ‘मुख्यमंत्र्यांनी 24 तासात यू-टर्न घेतला तर…’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Eknath Shinde | संजय राऊतांच्या ‘परत या’ आवाहनानंतर एकनाथ शिंदेचं थेट उत्तर; म्हणाले – ‘आता गाडी…’

Related Posts