IMPIMP

Russian President Vladimir Putin | रशियाने युक्रेनवर केला लष्करी हल्ला; पुतीन यांची युद्धाची घोषणा, चार शहरावर मिसाईल हल्ले

by nagesh
Russian President Vladimir Putin | Russia's Putin authorises special military operation against Ukraine

मॉस्को : वृत्तसंस्था रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेनविरोधात युद्धाची (War) घोषणा केली आहे. युक्रेन (Ukraine) मधील दोनेत्स्क भागावर हल्ला करण्याचे आदेश पुतीन यांनी रशियन सैन्याला (Russian military) दिले आहेत. युक्रेन सैन्याने (Ukraine military) शस्त्र खाली टाकावी, असे आवाहन पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

युक्रेनमधील चार शहरामध्ये रशियाने मिसाईल हल्ले (Russia launches missile strikes) सुरु केले आहेत. रशियाने युक्रेनवर युद्ध लादले असून, हे अनाकलनीय असल्याचे सांगत अमेरिकेने (America) निषेध केला आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊन आपले पाऊल अगोदरच उघड केले होते. गेल्या काही दिवसांमध्ये रशियाने युक्रेनमधील आपल्या सर्व राजनैतिक अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना मायदेशी आणण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर रशियाच्या बाहेर सैन्यांचा वापर करण्यास पुतीन यांनी या अगोदरच मान्यता दिली होती. त्यानंतर आज सकाळी पुतीन यांनी युक्रेनवर हल्ल्याचा आदेश रशियन सैन्याला दिला.

बंडखोरांच्या ताब्यातील भागात मोठे स्फोट ऐकू आले आहेत. रशियन सैनिक क्रिमियामार्गे युक्रेनमध्ये दोन लाखांहून अधिक रशियन सैनिक सीमेवर तैनात करण्यात आले आहे. पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक भागात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. युक्रेनमध्ये देशव्यापी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ऑस्ट्रेलियाने (Australia) रशियावर (Russia) निर्बंध जाहीर केले आहे.
त्यानुसार रशियावर आर्थिक निर्बंध घालण्यात आले असून लवकरच प्रवास निर्बंधही घातले जातील,
असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australia Prime Minister Scott Morrison) यांनी जाहीर केले आहे.
या युद्धामुळे आता संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता असून
युरोपला (Europe) होणारा गॅस पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे.

Web Title :- Russian President Vladimir Putin | Russia’s Putin authorises special military operation against Ukraine

हे देखील वाचा :

Pune Police | पुण्यातील वजनदार पोलिस कर्मचार्‍याचं तडकाफडकी निलंबन ! अवैध धंद्येवाल्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या संपर्कात असल्याचा ठपका

Pune Police | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा ‘रूद्रावतार’ ! आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकास केलं कंट्रोलशी संलग्न; अनेकांचे धाबे दणाणले, ‘सेक्शन’ गरम

Pune Crime | ‘कन्फाईनमेंट डिटेन्शन सेल’मध्ये 20 दिवस छळ केल्याप्रकरणी दोघा कर्नलसह 7 जणांवर गुन्हा दाखल; खडकीतील CSD मधील घटना, मिलटरी कॅन्टीनची दारु बाहेर विकल्याच्या आरोपातून केला होता छळ

Related Posts