IMPIMP

‘टार्गेट’ मिळाल्याची वाझेंकडून NIA कबुली? घेतले आणखी एका बड्या मंत्र्याचे नाव? महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ

by pranjalishirish
Sachin vaze sensational claim about home minister anil deshmukh and one another minister of uddhav thackeray cabinet

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन-  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांनी सचिन वाझे Sachin Vaze याला 100 कोटीचे टार्गेट दिल्याचा खळबळजनक आरोप केला. मनसुख हिरेन प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांच्याकडे एनआयएने 100 कोटींच्या टार्गेट संदर्भात चौकशी केली. एनआयएच्या चौकशीत सचिन वाझेने गौप्यस्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावून मला पैसे वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचे वाझेंनी एनआयएकडे कबुल केलं असल्याचं देखील म्हंटलं जातंय. मात्र, त्याला अद्याप अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान, सचिन वाझेने केलेल्या गौप्यस्फोटामुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल ! 65 अधिकाऱ्यांची एकाचवेळी उचलबांगडी

सचिन वाझे Sachin Vaze यांच्याकडे एनआयएने केलेल्या चौकशीत त्यांनी आणखी एका हायप्रोफाईल मंत्र्याचं नाव घेतलं आहे. या मंत्र्याने मागील वर्षी पैसे वसुली करण्याचे टार्गेट दिल्याचा दावा सचिन वाझे यांनी चौकशीत केला आहे. सचिन वाझे यांच्या या दाव्यामुळे, पैसे वसुलीचे टार्गेट देणारा दुसरा नेता कोण, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. सचिन वाझे यांच्या नव्या दाव्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

GROHE Hurun Report : मंगल प्रभात लोढा देशातील सर्वात ‘श्रीमंत’ बिल्डर, जाणून घ्या त्यांच्यासह इतर मोठया ग्रुपच्या संपत्तीबाबत

ठाकरे सरकारमधील तो मंत्री कोण ?

मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेला Sachin Vaze  अटक केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पदावरुन हटवण्यात आले. पदावरुन हटवण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. सिंह यांनी गृहमंत्र्यावर टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे महाविकास आघाडीच्या प्रतिमेला धक्का बसला. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करण्यासाठी खुद्द शरद पवार यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सचिन वाझे यांनी पैसे वसुलीचे टार्गेट दिल्याची कबुली दिल्यानंतर सरकार अडचणीत आले आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे, सचिन वाझे यांनी आणखी एका मंत्र्याचे नाव घेतले आहे. त्यामुळे तीन पक्षांच्या या सरकारमधील कोणत्या पक्षाच्या नेत्याने सचिन वाझे यांना वसुलीचे टार्गेट दिले होते. हे येत्या काळात समजेल. परंतु या सगळ्या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

धनंजय मुंडेंना दुसऱ्यांदा ‘कोरोना’ची लागण

ठाकरे सरकार समोरील अडचणी वाढल्या

परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सनसनाटी आरोप केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे Sachin Vaze यांना दर महिन्याला 100 कोटी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याचे पत्रात म्हटले. यानंतर अनिल देशमुख यांनी परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील गृहमंत्र्यांवर केलेले आरोप फेटाळून लावले. मात्र, सचिन वाझे यांनीच गृहमंत्र्यांनी 100 कोटी वसुल करण्याचे टार्गेट दिल्याची कबुली दिल्याने अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत.

Aslo Read : 

Phone Tapping : ‘काँग्रेसचा हिस्सा किती हे त्यांनी सांगावं?’

West Bengal Election 2021 : बंगालमध्ये ना TMC ना BJP ला मिळणार बहुमत, लेफ्ट-कॉंग्रेस बनणार ‘किंगमेकर’

खा. नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा शिवसेनेवर वारंवार टीका का करतात?

सबळ पुरावे बंद पाकिटात गृहसचिवांना दिलेत, योग्य कारवाई होईल – फडणवीस

ममता बॅनर्जींनी 10 वर्षांच्या सत्ताकाळात बंगालला कंगाल केले, रामदास आठवले यांची टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांना देखील ‘कोरोना’ची लागण, यापूर्वीच आदित्य आढळले होते Covid-19 पॉझिटिव्ह

फोन टॅपिंग करण्याचा अधिकार फडणवीसांना दिला कोणी; जयंत पाटलांचा सवाल

Related Posts