IMPIMP

Nawab Malik – Sameer Wankhede | नवाब मलिक-वानखेडे वादात नवा ट्विस्ट; आता समीर वानखेडेंच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांची एन्ट्री

by nagesh
sameer-wankhede-sameer-wankhede-family-to-file-complaint-against-ncp-minister-nawab-malik-in-aurangabad

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन – Nawab Malik – Sameer Wankhede | मागील काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणानंतर मोठ्या घडामोड घडताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर वानखेडे कुटूंबही या आरोपाच्या फैरीत उतरलं होतं. यानंतर या प्रकरणात समीर वानखेडेंच्या आत्यांची एन्ट्री झाली आहे. आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव (Gunfabai Gangadhar Bhalerao) यांनी मलिक यांच्या विरोधात अखेर औरंगाबाद कोर्टात (Aurangabad Court) तक्रार दाखल केली. तत्पुर्वी त्यांनी औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यातही (Mukundwadi Police Station) तक्रार दिली होती.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या आत्या गुंफाबाई यांनी नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आरोपांमुळे सातत्याने
समाजात आणि नातेवाईकांत बदनामी होत असल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार केली होती. त्यामुळं या प्रकरणात आता नवीन ट्विस्ट आला आहे.
तसेच, पोलिसात तक्रार केल्यानंतर देखील गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे अखेर गुंफाबाई यांनी थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. मलिक यांच्यावर
आट्रॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हा न्यायालयात आपल्या वकिलामार्फत केली. या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आल्याने चर्चेला
उधाण आलं आहे.

दरम्यान. मागील दोन ते तीन महिन्यांपासून मलिक (Nawab Malik) आणि वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यातील वाद वाढतच असल्याचं दिसत आहे. मलिक यांच्याकडून दररोज नवाच आरोप केले जात असल्याने राज्यात मोठी घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, वानखेडे कुटुंबाने मलिकांविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. तसेच समीर वानखेडेंच्या धर्माबाबतही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, वानखेडे कुटुंबीयांनी मुस्लिम असल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. अशाच आता समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई यांनी या प्रकरणात एन्ट्री घेतली आहे.

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिला सल्ला; म्हणाले – ‘सरकार तुमचंच आहे पण त्याला लुटू नका’

Modi Government | साखर निर्यातीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या शेतकर्‍यांवर काय होणार परिणाम

OBC Reservation Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! OBC संवर्गातील 400 जागांवरील निवडणुका स्थगित

Related Posts