IMPIMP

Sameer Wankhede | NCB अधिकारी समीर वानखेडेंची आणखी एक कारवाई ! ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करुन 2 महिलांना अटक

by nagesh
Sameer Wankhede | sameer wankhede led ncb team busts drug racket in goa on new year evening

पणजी : वृत्तसंस्था – कार्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) छापेमारी करुन अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केल्यानंतर एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या झालेले आरोप प्रत्यारोप चांगलेच गाजले. यांच्यातील आरोप प्रत्यारोप अजूनही सुरुच आहे. मात्र, आता वानखेडे हे मलिक यांच्यामुळे नाही तर त्यांनी केलेल्या एका कारवाईमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी एक कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने गोव्यात ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश (Drug Racket Exposed in Goa) केला. एनसीबीच्या निवेदनानुसार, गोव्यातील सिओलीम (Siolim) येथून दोन महिलांना अटक (Two Women Arrest) केली आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारचे प्रतिबंधित ड्रग्ज जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई (Mumbai) आणि गोवा झोनच्या एनसीबी पथकांनी घटनास्थळावरुन 1.30 गांजा आणि 49 टॅबलेट, 25 ग्रॅम अ‍ॅम्फेटामाइन (Amphetamine), 2.2 ग्रॅम कोकेन (Cocaine), 1 ग्रॅम एमडीएमए पावडर (MDMA Powder) आणि एक वाहन जप्त केले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक महिला एमडीएमए आणि इतर औषधे पुरवत होती. ती ड्रग सिंडिकेट (Drug syndicate) चालवणाऱ्या एका नायजेरियन महिलेसाठी काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात असे समोर आले की,
गोव्यातील एक महिला ओरीपी ड्रग सिंडिकेट चालवणाऱ्या इतर नायजेरियन (Nigerian) महिला आरोपींच्या वतीने एमडीएमए आणि ड्रग्स पुरवत असे.
सिंडिकेटमध्ये आणखी एक सदस्य असून परदेशी नागरिकांचाही समावेश आहे,त्यांना ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
याशिवाय महिला आरोपींची स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) रवानगी केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Web Title :- Sameer Wankhede | sameer wankhede led ncb team busts drug racket in goa on new year evening

हे देखील वाचा :

Ambernath Crime News | अंबरनाथ शहरातील धक्कादायक घटना ! फिरायला आलेल्या तरुणीवर 3 मित्रांनी केला सामुहिक बलात्कार

LIC Bachat Plus Scheme | एलआयसीच्या बचत प्लस योजनेत होतो दुप्पट फायदा, सेव्हिंगसह मिळेल लाईफ इन्श्युरन्सचा फायदा; जाणून घ्या सर्वकाही

EPFO | ईपीएफओ कर्मचाऱ्यांना नववर्षात गिफ्ट ! किमान मासिक निवृत्तीवेतन 1 हजार रुपयांवरून 9 हजार होण्याची शक्यता

Related Posts