IMPIMP

Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | ‘राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे एमआयएम-समाजवादीच्या दाढ्या कुरवाळतायत’; मनसेचा घणाघात

by nagesh
Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande corruption allegations on uddhav thackeray reveals on 23 january

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची औरंगाबाद (Aurangabad) येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात आज सायंकाळी 6 वाजता सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी औरंगाबाद मध्ये सभा घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर आज मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे  यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Sandeep Deshpande On Uddhav Thackeray)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संदीप देशपांडे म्हणाले, “तत्वासाठी सत्तेवर लाथ मारणारे दिवंगत बाळासाहेब कुठे आणि एका राज्यसभेच्या जागेसाठी एमआयएम आणि समाजवादीच्या दाढ्या कुरवळणारे आमचे नंबर वन कुठे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुढे ते म्हणाले, “असो आज संभाजीनगर मध्ये तोफ धडाडणार अस म्हणतात, लवंगी वाजली तरी पुरे.” असं ट्विट देशपांडे यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Elections) जवळ आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
6 व्या जागेसाठी आवश्यक असलेल्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शिवसेना आणि भाजपकडून (BJP) प्रयत्नांची शर्थ केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचीही मदत घेतली जाण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर शिवसेनेकडून हालचालीही सुरू आहेत. याच मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Web Title :- Sandeep Deshpande On Uddhav Thackeray | mns leader sandeep deshpande targeted chief minister uddhav thackeray over aurangabad rally and rajya sabha elections

हे देखील वाचा :

Pune Fire News | औंधमधील सानेवाडीतील आय टी पार्कमधील इमारतीला भीषण आग; इमारतीतील फायर सिस्टिम होती बंद

Tata Elxsi Share | टाटा ग्रुपच्या ‘या’ स्टाॅकने केली गुंतवणूकदारांची चांदी; 1 लाखावर 4 कोटींचा जबरदस्त परतावा, जाणून घ्या

Hyderabad Gang Rape Case | हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण ! आमदाराच्या मुलाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Related Posts