IMPIMP

Sandipan Bhumre | ‘कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचे अंबादास दानवेंनी येऊन शोधून दाखवावे’ – संदिपान भुमरे

by nagesh
Sandipan Bhumre | 'Ambadas Demons should come and find corruption in the factory

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन  – औरंगाबादमधील एका कारखान्यात संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी पैशांचा गैरव्यवहार (Money Laundering) आणि अफरातफर केली, असा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला होता. त्यावर संदिपान भुमरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमचा साखर कारखाना भंगार झाला होता. तो आम्ही शेतकऱ्यांसाठी चालू केला आहे. त्यात काय पैशांची अफरातफर होणार आहे, असे संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) म्हणाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हा कारखाना भंगार झाला होता. 12 वर्ष हा कारखाना बंद होता. आम्ही तो अथक परिश्रमांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केला. शेतकऱ्यांसाठी चालू केलेल्या कारखान्यात काय पैशांचा गैरव्यवहार होणार आहे? त्यांनी ते इकडे येऊन तपासावे. अंबादास दानवेंना काही काम नाही, त्यामुळे त्यांना माझ्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. त्यांना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) काम दाखवावे लागते. त्यामुळे ते मला यात खेचत आहेत. त्यांचे काम विरोध करणे आहे. त्यामुळे ते मला चांगले म्हणू शकत नाही. त्यांनी मला चांगले म्हणावे, अशी माझी अपेक्षा पण नाही, असे भुमरे यावेळी म्हणाले.

शुक्रवारी अंबादास दानवे यांनी पोलिसांवर टीका केली होती. तुम्ही पगार भुमरेंचा घेता, की शासनाचा घेता?
असा प्रश्न अंबादास दानवेंनी पोलिसांना केला होता. त्यावर देखील संदिपान भुमरे (Sandipan Bhumre)
यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुमरे म्हणाले, पोलीस पगार शासनाचा घेतात. पोलिसांनी असे काही काम केले नाही,
की मी त्यांना पगार द्यावा. त्यामुळे अंबादास दानवेंना काय बोलायचे आहे, ते त्यांनी स्पष्ट बोलावे.
त्यांना विरोधात बोलण्यासाठीच विरोधी पक्षनेता केला आहे. त्यामुळे ते त्यांचे काम करत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sandipan Bhumre | ‘Ambadas Demons should come and find corruption in the factory

हे देखील वाचा :

Panvel Crime | फार्म हाऊस जवळ ऑडी गाडीत आढळलेला मृतदेह तळेगाव दाभाडे येथील गुन्हेगाराचा, दोन दिवस मृतदेह गाडीत पडून

Chandrakant Khaire | चंद्रकांत खैरे भाषणाला उभे राहिले आणि लोकांनी खुर्च्या सोडल्या

Related Posts