IMPIMP

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

by nagesh
Raj Thackeray | raj thackeray comment on vedant marathe veer daudale saat move in kudal

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन MNS Chief Raj Thackeray | सतत गैरहजर राहिल्याने शिराळा न्यायदंडाधिकाऱ्यांनी (Shirala Magistrate) 28 एप्रिल 2002 रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यासह 10 जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-Bailable Warrant) बजावलं होतं. याप्रकरणी 8 जूनला सुनावणी झाली असता राज ठाकरे गैरहजर राहिले. यानंतर आता सांगली मधील शिराळा कोर्टाने (Shirala Court) अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिराळा न्यायालयाने 2008 साली राज ठाकरेंच्या अटकेनंतर झालेल्या आंदोलन याप्रकरणी एप्रिल महिन्यात वॉरंट काढलं होतं. मात्र, राज ठाकरेंना आता कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले. मनसेचे नेते शिरीष पारकर (MNS Leader Shirish Parkar) या सुनावणीसाठी उपस्थित होते. त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला. पण राज ठाकरे गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात पुन्हा एकदा अजामीनपात्र वॉरंट काढले गेले आहे.

दरम्यान, 2008 साली रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात कल्याण न्यायालयाच्या आदेशाने राज ठाकरेवर अटकेची कारवाई झाली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास दुकानदारांना भाग पाडले होते. तर, विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात (Shirala Police Station) गुन्हा दाखल केला होता.
याप्रकरणी शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह 10 मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- sangli shirala court again issues non bailable warrant against mns chief raj thackeray

हे देखील वाचा :

Bhandara Crime | 12 वी पास झाल्यानंतर सेलिब्रेशनसाठी गेलेल्या युवकाचा धक्कादायक शेवट

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या प्रमुख शहरातील रेट

Rajya Sabha Election 2022 | केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! राज्यसभेच्या निवडणूकीत अपक्ष आमदारांना मत ‘दाखवता’ येणार नाही

Related Posts