IMPIMP

Sanjay Rathod On Chitra Wagh | संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले – ‘मी आत्तापर्यंत शांत होतो, पण आता…’

by nagesh
Sanjay Rathod On Chitra Wagh | eknath shinde camp rebel sanjay rathod on bjp chitra wagh maharashtra cabinet expansion

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Rathod On Chitra Wagh | पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणातील (Pooja Chavan Suicide Case) वादग्रस्त आमदार संजय राठोड यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आल्यानंतर राज्यात गदारोळ सुरू आहे. यावरून विरोधी पक्ष सरकारला जाब विचारत असतानाच, भाजपा महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही राठोड यांची मंत्रिपदी झालेली निवड दुर्दैवी असल्याचे म्हटल्याने शिंदे गट अडचणीत आला आहे. मात्र, मंत्रिपदाची ताकद मिळाल्यानंतर वादग्रस्त संजय राठोड यांनी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनाच इशारा दिला आहे. (Sanjay Rathod On Chitra Wagh)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पूजा चव्हाण प्रकरणात मविआ सरकारमध्ये राजीनामा द्यावा लागलेले संजय राठोड यांची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये वर्णी लागल्यानंतर त्यांनी चित्रा वाघ यांना इशारा देताना म्हटले की, लोकशाहीत सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. चित्रा वाघ यांना माहिती नसावे. त्यांना कागदपत्रे पाठवण्याची व्यवस्था करु. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली आहे. न्यायव्यवस्थेवर आणि पोलिसांवर विश्वास असल्याने मी आतापर्यंत शांत होतो. सर्व सत्य बाहेर आलं आहे. मी नको ते भोगले आहे. (Sanjay Rathod On Chitra Wagh)

संजय राठोड म्हणाले, माझी सर्वांना विनंती आहे, माझाही परिवार आहे, पत्नी आहे, मलाही मुलंबाळ आहेत, वयस्कर आई-वडील आहेत.
एखाद्याला किती त्रास होतो याचा आपणही विचार केला पाहिजे.
मी चार वेळा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलो आहे. तसे असते तर जनतेने मला निवडून दिले नसते.

चित्रा वाघ यांना इशारा देताना राठोड म्हणाले, आत्तापर्यंत मी शांत होतो, पण असेच सुरु राहिले तर मी कायदेशीर मार्ग अवलंबणार, नोटीसही देणार.
माझ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी दाखल झालेली याचिका पुणे कोर्टाने दोन वेळा फेटाळून लावली होती.
माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल नाही, कोणतीही तक्रार नाही. तरीही आरोप झाले म्हणून चौकशी करण्यात आली.
त्यानंतर मी मंत्रीपदावरून बाजूला झालो होतो. याप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी झाली आहे.

राठोड पुढे म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. पण आपण काय बोलत आहोत याचे भान हवे.
मीदेखील जबाबदार लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे यापुढे कोणी काही बोलले तर मी कायदेशीर कारवाई करणार.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title : – Sanjay Rathod On Chitra Wagh | eknath shinde camp rebel sanjay rathod on bjp chitra wagh maharashtra cabinet expansion

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री ?, चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

Panshet Dam | पानशेत धरण 100 टक्के भरले ! नदीत 7376 क्युसेक्सचा विर्सग सुरु, मुळशीही 88 टक्के भरले

Former MLA Baburao Pacharne Passed Away | शिरुर-हवेली मतदारसंघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

Related Posts