IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊतांचा इशारा; म्हणाले – ‘…तर नारायण राणे यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो’

by nagesh
UP Assembly Election Results | shivsena mp sanjay raut on yogi adityanath and sp akhilesh yadav up assembly election results 2022

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) मारहाण प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना अटक होणार अशी चर्चा आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी झडत असल्याचे दिसते. यातच आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘नितेश राणे कुठे आहेत, याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी लपवली तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संजय राऊत म्हणाले, ‘हत्येच्या प्रयत्नातील हव्या असणाऱ्या आरोपीला पोलीस शोधत आहेत. मात्र केंद्रीय मंत्री म्हणत आहेत की मला माहीत आहे पण सांगणार नाही. हे कायद्याचं उल्लंघन आहे. आपण केंद्रीय मंत्री आहात, पोलिसांना सहकार्य करा. कायद्यापासून महत्वाची माहिती लपवू नका. आपला मुलगा असेल तरी माहिती देणे गरजेचं आहे. अन्यथा आरोपींना पाठीशी घातलं म्हणून तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो,’ असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

दरम्यान, नितेश राणेंबाबत महाविकास आघाडी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला होता.
यावरुनही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर दिलं आहे.
‘राजकीय सुडापोटी आमच्यावर काय करावाई झाली याचा मी एक
साक्षीदार आहे. भाजप नेत्यांच्या सांगण्यावरून केंद्रीय तपास
यंत्रणांचा गैरपावर करून महाविकास आघाडीचे नेते आणि
त्यांच्या कुटुंबियांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई केली जात असल्याचं ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut | bjp-mp-and union minister narayan rane may also be charged shiv sena mp sanjay rauts warning

हे देखील वाचा :

MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर अटकेची तलवार कायम? जामीन अर्जावर उद्या निर्णय

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

Ration Card | देशातील कोणत्याही ठिकाणाहून तुम्हाला घ्यायचे असेल रेशन, तर करावे लागेल ‘हे’ काम; जाणून घ्या

Related Posts