IMPIMP

Sanjay Raut Criticize CM Eknath Shinde Group | भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा, म्हणाले – ’50 खोकेवाले आता…’

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut criticized bjp over statement on shivaji maharaj by bhagat singh koshyari

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनSanjay Raut Criticize CM Eknath Shinde Group | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी वादग्रस्त वक्तव्य करून महाराष्ट्राचा अवमान केल्याचा आरोप होत आहे. मुंबईत एका कार्यक्रमात कोश्यारी यांनी हे वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसनंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. 50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत, असे म्हणत राऊत यांनी राज्यपालांचा वादग्रस्त व्हिडीओ ट्विट केला आहे. (Sanjay Raut Criticize CM Eknath Shinde Group)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला. स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांचा साधा निषेध तरी करा. मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. ऐका, ऐका. (Sanjay Raut Criticize CM Eknath Shinde Group)

राऊत यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय नदी आणि आणि आता काय हा मराठी माणूस. महाराष्ट्राचा घोर अपमान ! 50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत. थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल, तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय ?

आता तरी ऊठ मराठ्या ऊठ. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत. मराठ्या तुलाच उठावे लागेल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

काय म्हणाले होते राज्यपाल ?

मुंबईत एका नामकरण सोहळ्यात बोलताना भगतसिंह कोश्यारी म्हणाले, कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हणता येणार नाही. या कार्यक्रमाला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी इ. उपस्थित होते.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात अतिशय संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
मनसेने देखील राज्यपालांच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत हे पार्सल उत्तराखंडला परत पाठवण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तर सचिन सावंत यांनी म्हटले की, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे.
गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे.
यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहे, शिवाय महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला आहे.

Web Title : – Sanjay Raut Criticize CM Eknath Shinde Group | shivsena leader and mp sanjay raut criticize cm eknath shinde group over controversial statement of bhagat singh koshyari

हे देखील वाचा :

Love Hormone | ‘या’ 5 गोष्टी खाल्ल्याने वाढेल Oxytocin, प्रेम करण्याची इच्छा होईल आणखी जास्त

Methi For Diabetes | डायबिटीजचे रुग्णांनी रोज या पद्धतीने करावे मेथीचे सेवन, नियंत्रणात राहील Blood Sugar

Pune Crime | Google वर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधणे पडले सव्वा दोन लाखांना; भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात FIR

Related Posts