IMPIMP

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले-‘नैरोबी-केनियाला देखील… ‘

by nagesh
MP Sanjay Raut | devendraji are the daughters of the poor lying on the streets sanjay raut shared the photo itself

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्यात आज (दि. 20) ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल (Gram Panchayat Elections Result-2022) आहे. यामुळे सर्वच पक्षांचे आणि जनतेचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP), शिंदे गटाने (Shinde Group) या निवडणुकांसाठी मोठी मोर्चेबांधणी केली होती. सर्वांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपुरात घेतलेल्या बैठकीत एक भाकीत केले होते. त्यावर शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसांपूर्वी नैरोबी-केनियाला ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. तिथेही हे म्हणतील की आमचे लोक निवडून आले, त्यात काय आहे, अशा खोचक शब्दात संजय राऊतांनी (Sanjay Raut) टोला लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ग्रामपंचायत निवडणुकांचा दावा कोणीही कधीही करू नये. ज्या निवडणुका चिन्हावर लढविल्या जातात, तिथे असे दावे केले जाऊ शकतात. ग्रामपंचायतीच्या निवडणुका पॅनलवर म्हणजे वेगळ्या पद्धतीने लढविल्या जातात. हे आम्ही फडणवीसांना सांगायला नको. तुम्ही खुशाल दावे करा. दोन दिवसांपूर्वी नैरोबी केनियाला देखील ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. तिथेही हे लोक म्हणतील आमचे सरपंच निवडून आले. उसमे क्या है… त्यामुळे त्यांच्या भाकिताला महत्व नाही. देशात अशा निवडणुका कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने लढतात. आपापले पॅनल उभे केले जातात. कुणीही जिंकून येते, असे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

नागपुरात पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधताना भाजपचा विजय होईल,
असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला होता. उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आहे.
मी आजच तुम्हाला सांगतो, लिहून घ्या, महाराष्ट्रात पुन्हा नंबर एक भारतीय जनता पक्षच असेल.
आपल्याला बहुमत मिळेल. कोणी काहीही काळजी करु नका. पुन्हा एकदा जनता आपल्या पाठिशी उभी राहणार आहे, असे फडणवीस म्हणाले होते.

Web Title :- Sanjay Raut | gram panchayat election results 2022 sanjay raut thackeray group shivsena slams devendra fadnavis

हे देखील वाचा :

Poonam Pandey | ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकली पूनम पांडे; कातील अदांनी चाहते घायाळ…

Winter Session -2022 | महाविकास आघाडीची आजही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

Google for India 2022 | ‘ट्रांजक्शन सर्च फीचर’पासून ‘डिजिलॉकर’पर्यंत, गुगलचे CEO सुंदर पिचाई यांच्या मोठ्या घोषणा

Related Posts