IMPIMP

Sanjay Raut | तुम्ही सुनिल राऊत यांना शिंदे गटाची फोडाफोडी करण्यासाठी पाठवणार होता का? संजय राऊत म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut | shivsena mla sunil raut on pmla court granted bail sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच शिंदे गटाने ठाकरे सरकारचा (Thackeray Government) पाठिंबा काढला असल्याचे पत्र राज्यपालांना दिल्याने सरकार अल्पमतात आले आहे. शिवसेनेचे एक-एक नेते शिंदे गटात सहभागी होत असताना रविवारी सकाळपासून शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनिल राऊत (Sunil Raut) हे शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. सुनील राऊत लवकरच गुवाहटीत जातील असे सांगितले जात होते. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली होती. परंतु काही तासानंतर ही केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले. या सगळ्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषदेत भाष्य केलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तुम्ही सुनिल राऊत यांना शिंदे गटाची (Eknath Shinde Group) फोडाफोडी करण्यासाठी पाठवणार होता का? तसा तुम्ही प्लॅन आखला होता का, असा प्रश्न संजय राऊत (Sanjay Raut)  यांना विचारण्यात आला. मात्र, संजय राऊत यांनी हा दावा फेटाळला. मात्र दुसऱ्याच क्षणाला राऊतांनी सूचक वक्तव्य करुन याबाबतची उत्कंठा आणखी वाढवली. ते म्हणाले, सुनील राऊत माझ्यासोबतच आहेत. तुम्ही त्यांना पाहतच असाल. तेच सर्व मोर्चा सांभाळत आहेत, असे राऊत म्हणाले. पण तुम्हाला काय होईल, ते लवकरच कळेल. या सगळ्याचा उलगडा लवकरच होईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

या पत्रकार परिषदेमध्ये सुनील राऊत हे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, मी बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) कट्टर शिवसैनिक आहे. तसेच मी कुठेही जाणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेचे (Shivsena) जितके आमदार वाचतील त्यांना घेऊन आम्ही महाराष्ट्रात पक्ष वाढवू. नारायण राणे (Narayan Rane), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) हे पक्ष सोडून गेल्यानंतरही पक्ष वाढला. शिवसेनेचे 56 आमदार आहेत. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली ते आगामी काळात 100 च्या वर जातील, असा दावाही सुनील राऊत यांनी केला.

शिवसेनेचे नेते शिंदे गटात सहभागी होत असताना तुम्हाला तशी भावना निर्माण होत नाही
का, या प्रश्नाला उत्तर देताना सुनील राऊत म्हणाले, तुम्ही पूर्वीची वक्तव्य तपासून बघा, हेच लोक सांगत होते
की, भाजप शिवसेनेला संपवत आहे. भाजपने (BJP) शिवसेनेचे लोक पाडली.
याच लोकांच्या सांगण्यावरुन उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले, असे त्यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut | is shivsena leader and mla sunil raut planning to join eknath shinde camp sanjay raut reaction

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | ठाकरे सरकार अल्पमतात; शिंदे गटाचे राज्यपालांना पत्र ?

Maharashtra Political Crisis | …म्हणून CM उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय; मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

Maharashtra Political Crisis | ‘उद्धव ठाकरेंनी आता पक्षाचे नाव शिवसेना ऐवजी ‘शिल्लक सेना‘ करून घ्यावे’; मनसेचा खोचक टोला

Related Posts