IMPIMP

Sanjay Raut | ‘महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल’ – संजय राऊत

by nagesh
 Pune Crime News | Youth in Chandannagar detained in case of MP Sanjay Raut threat case; Pune police handed the youth over to Mumbai police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आता चिघळला आहे. बेळगाव हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर महाराष्ट्राच्या ट्रकवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक आणि दगडफेक केली. त्याचे जशास तसे उत्तर स्वारगेट (पुणे) बस स्थानकात कर्नाटकच्या गाड्यांना काळे फासून शिवसेनेने दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने कर्नाटकसोबत आता रस्त्यावरील लढाईला आरंभ केला आहे. त्यावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या विषयावर महाराष्ट्र जर पेटला, तर सरकारला भारी पडेल, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या विषयावर महाराष्ट्र जर का पेटला, तर राज्य सरकारला भारी पडेल. कर्नाटकचे नंतर पाहू, आधी राज्य सरकारला जाब विचारू. राज्य सरकार मूग गिळून, डोळे मिटून बसले आहे. त्यांना स्वाभिमान, अभिमान, लोकभावना या गोष्टी माहीत आहेत का? की सर्व खोक्यात वाहून गेले?, अशी आगपाखड राऊत यांनी केली. तसेच पुण्यात कर्नाटकच्या विरोधात पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांना शिंदे सरकारचे पोलीस लाठ्याकाठ्यांनी बदडतात.

तुम्ही कोणाचे काम करत आहात? तुमच्या अंगात जर मराठी रक्त असेल, तर तुम्ही शिवसैनिकांना रोखू नका,
असे माझे महाराष्ट्र पोलिसांना आव्हान आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठे आहेत? त्यांचे चाळीस आमदार कुठे आहेत?
त्यांनी अगोदर बेळगावला गेले पाहिजे. आमच्या सार्वजनिक संपत्तीचे नुकसान बेळगावात सुरू आहे.
मुख्यमंत्री कुठे भूमिगत झाले आहेत, असे यावेळी राऊत म्हणाले. (Sanjay Raut)

राज्यात अत्यंत दुर्बल, लाचार आणि कमकुवत सरकार आहे. या सरकारला पाय नसून खोके आहेत.
त्यामुळे महाराष्ट्राचे पाणी रोखण्याचे काम कर्नाटक करत आहे. यापूर्वीही त्यांनी असे केले होते.
त्यांना शिवसेनेने चोख उत्तर दिले होते. आजही शिवसेना त्यांना उत्तर देईल, असेही राऊत म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut | karnataka borderism shiv sena uddhav balasaheb thackeray group sanjay raut targets criticise maharashtra government eknath shinde bommai

हे देखील वाचा :

Shambhuraj Desai | महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये याकरिता दौरा पुढे ढकलला; शंभूराज देसाई

Hrishikesh Kanitkar | महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी ऋषिकेश कानिटकर

Gokul Milk Rate Hike | महागाईच्या झळा कायम; गोकुळने केली दूध दरात वाढ

Pune Crime | पुण्यात रिक्षाचालकांना बनावट कॅलिब्रेशन प्रमाणपत्र; शासनाची फसवणूक करणाऱ्यांना अटक

Related Posts