IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊतांचं मोठं भाकित, म्हणाले – ‘2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी 48 पैकी 45 जागा जिंकेल’

by nagesh
Sanjay Raut | mahavikas aghadi will win 45 out 48 seats 2024 lok sabha elections sanjay rauts big prediction in one interview on TV

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेल्या खासदार संजय राऊत यांनी आगामी राजकीय परिस्थितीवर भाष्य तसेच काही भाकीत केलं आहे. निमित्त होत ते महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत असल्याचे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत (Sanjay Raut) यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून लढलो तर ४८ पैकी ४५ जागा आम्हाला मिळतील असे सांगतानाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकाही काँग्रेससह महाविकास आघाडी होण्यात मला काहीच अडचण वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत म्हणाले की, राज्यात काँग्रेसची (Congress) एकच जागा आहे. एकत्र लढल्यास पाच जागा होतील. त्यामुळे एकत्रित लढण्याचा काँग्रेसलाही
फायदा होईल. मात्र, प्रत्येकाने संयम ठेवला पाहिजे. एकूणच २०२४ च्या निवडणुकीत एकत्र लढल्यास महाविकास आघाडीला ४८ पैकी ४५ जागा
निश्चितच मिळतील. तर राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचंच मॉडेल दिसेल यात मला काही अडचण दिसत नाही.
यामध्ये काँग्रेसचाही सहभागी होणार नाही असे वाटत नाही.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
त्यावरही राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य करत अशा पुड्या कोण सोडत हे मला माहित नसल्याचे म्हंटले आहे.
राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याचा मी साक्षिदार आहे. कोणाच्याही डोक्यात हि कल्पना नव्हती किंवा असं होऊ शकत असा वाटलं नव्हतं.
त्यावेळी निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असं होऊ शकत असं सांगितलं. तेव्हा काय चर्चा झाल्या हे मला माहिती आहे.
त्याचवेळी शरद पवार यांनी राज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पूर्ण वेळ करणार असं स्पष्ट केलं होतं.
त्यामुळे या सरकारचा कालखंड पाच वर्षाचा आहेत त्यांच्या मनात शंका नाही.
कोणी कितीही खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Web Title :- Sanjay Raut | mahavikas aghadi will win 45 out 48 seats 2024 lok sabha elections sanjay rauts big prediction in one interview on TV

हे देखील वाचा :

Pune Crime | कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्तात सोने देण्याच्या नावाखाली 84 लाखांना गंडा; पुण्याच्या शिवाजीनगर गावठाणातील घटना

Pune NCP | ‘लसीकरणाचे योगदान देत आहेत पुनावाला आणि बॅनरबाजी करत आहेत चूनावाला’, राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘थँक्यू टॅक्स पेयर’ बॅनर लावून निषेध

Legislative Council Elections | काँग्रेसचे सतेज पाटील यांची बिनविरोध निवड, महाडिक यांची माघार

Related Posts