IMPIMP

Sanjay Raut | ‘शिल्लक शिवसेनेतील सर्व मर्द संपले असतील, तर महाराष्ट्र सैनिक संजय राऊतांना सुरक्षा पुरवतील’ – मनसे

by nagesh
Sanjay Raut | opposition mahamorcha sanjay raut on the 17th the mahamorcha will start no- one will be able to stop it sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याची माहिती राऊतांनी दिली होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापला असताना, संजय राऊत (Sanjay Raut) आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी कर्नाटकातून धमक्या येत आहेत, असे राऊत म्हणाले. पण महाराष्ट्र नविनिर्माण सेनेने त्यांच्या या दाव्याची टिंगल केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना खरेच धमकी आली, की ते कंड्या पिकवत आहेत, असे मनसेने विचारले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊतांच्या विधानाची खिल्ली उडवली आहे. काळे लिहितात, “सौ दाऊद ज्यांना घाबरतात, त्यांना धमकी आल्याचे कळत आहे. काळजी करू नका, सरकार संरक्षण देईलच. पण, जर शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील, तर संजय राऊतांना महाराष्ट्र सैनिक छातीचा कोट करून सुरक्षा पुरवतील. मात्र, चर्चेत राहण्यासाठी अशा कंड्या पिकवू नका. खरेच यांना धमकी आली का हे सरकारने पाहावे.”

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीदेखील राऊतांना आलेल्या धमकीवर संशय घेतला होता. राणा म्हणाल्या होत्या, धमकी कुणाला येत असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे. लोकप्रतिनिधीला कोणी थेट फोन करत असेल, तर त्याची चौकशी अधिक गांभीर्याने घेतली पाहिजे. राऊत यांच्या वक्तव्यामागे नेहमी काही ना काही अजेंडा असतो. यावेळीसुद्धा असेल. त्यामुळे या फोन कॉलची खरोखरच चौकशी झाली पाहिजे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

गुरुवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सविस्तर भूमिका मांडली होती.
यावेळी आपल्यावर हल्ला करण्याची धमकी कन्नड वेदिके संघटनेने दिल्याचा दावाही त्यांनी केला होता.
कन्नड वेदिके संघटनेने महाराष्ट्रात येऊन माझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली.
हा माझ्यावरील हल्ला नसेल, हा संपूर्ण महाराष्ट्रावरील हल्ला असेल, यावर भाजपा काही बोलणार आहे की थंडपणे पाहणार
आहे? शिवसेनेच्या नेत्यांना महाराष्ट्रात येऊन तिकडच्या संघटना धमक्या देतात, हल्ले करू म्हणतात, यावर भाजपाने बोलावे, असे राऊत म्हणाले होते.

Web Title :- Sanjay Raut | mns gajanan kale mocks sanjay raut shivsena thackeray group on threat claim

हे देखील वाचा :

Basavaraj Bommai | ‘महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही’ – बसवराज बोम्मई

MP Amol Kolhe | “कर्नाटक सरकारकडून अडेलटट्टूपणाचे धोरण…” गृहमंत्री अमित शहांच्या भेटीनंतर अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

Vasant More | वसंत मोरेंची नाराजी दूर करायला अमित ठाकरेंची मध्यस्थी; नाराजी दूर होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष

NCP Chief Sharad Pawar | पवारांच्या इशाऱ्याला ४८ तास उलटल्यानंतर युतीच्या दोन नेत्यांकडून शरद पवारांवर निशाणा

Related Posts