IMPIMP

Sanjay Raut On BJP | ‘भाजपने पैसे वाया घालवू नयेत, राज्यसभेची 6 वी जागा महाविकास आघाडीच जिंकणार’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut On BJP | shivsena leader and mp sanjay raut slams bjp over rajya sabha election 2022

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut On BJP | राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) सहाव्या जागेसाठी भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) जोरदार चढा – ओढ होणार हे आता निश्चित झालं आहे. 10 जून रोजी होणाऱ्या मतदानाआधी राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसत आहे. अशातच या निवडणुकीवरून आता शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. (Sanjay Raut On BJP)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

त्यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “6 व्या जागेसाठी भाजप हा अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांची मते मिळवण्यासाठी भाजप त्यांना आमिष, प्रलोभने दाखवत आहे. त्यांच्यावर विविध माध्यमातून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. हा दबाव कशा प्रकारे आणला जात आहे, याची माहिती रोज आमच्यापर्यंत येत आहे. कारण भाजपकडून ज्यांच्यावर दबाव आणला जात आहे, ते आमचे मित्रच आहेत. या सगळ्यातून भाजपचं खरं चरित्र राज्यातील जनतेसमोर येत आहे. मात्र काहीही झालं तरी 6 व्या जागेसह राज्यसभेच्या एकूण 4 जागा आम्हीच जिंकणार आहोत. त्यामुळे भाजपने त्यांचा पैसा वाया घालवू नये,” असा टोला त्यांनी लगावला. (Sanjay Raut On BJP)

पुढे संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे समर्थ नेतृत्व आहे.
आम्ही निवडणुका काही आता पहिल्यांदाच लढत नाही. मागील पन्नास वर्षांपासून आम्ही निवडणुका लढवत आहोत.
विधानसभा, विधानपरिषदा, महापौर अशा निवडणुकांचा आम्हाला सर्वाधिक अनुभव आहे.
फक्त आमच्या हातामध्ये ED नाही. ED आणि CBI तुमच्या हातामध्ये आहे.
मात्र सरकार म्हणून इतर अनेक गोष्टी आमच्या हातात आहेत, हे लक्षात घ्या,” असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

Web Title :- Sanjay Raut On BJP | shivsena leader and mp sanjay raut slams bjp over rajya sabha election 2022

हे देखील वाचा :

Maharashtra Crime News | सेक्सटॉर्शन ! अश्लिल व्हिडिओ कॉल करुन खंडणी मागणार्‍या टोळीचा पर्दाफाश; पत्रकार, पोलिसाच्या ‘साथी’ने महिला करीत होती लोकांना ‘ब्लॅकमेल’

Congress Ramesh Bagwe Resigns | पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांचा राजीनामा; जाणून घ्या कारण

Haribhau Naik Passess Away | माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं 94 व्या वर्षी निधन

Related Posts