IMPIMP

Sanjay Raut On BJP | नारायण राणेंनी शरद पवारांना दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा भाजपला सवाल; म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut | sanjay raut reaction after election commission hearing on shivsena party name and bow and arrow sign

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut On BJP | केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना धमकी दिल्याची राज्यात चर्चा होत आहे. ‘बंडखोर आमदार हे सभागृहात येणारच आहेत आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार आहे, त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल,’ असं ते म्हणाले. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्वीट करत नारायण राणे यांना थेट सवाल केला आहे. ‘शरद पवारांना राणेंनी दिलेली धमकी भाजपची (BJP) भूमिका आहे का?’ असं राऊत म्हणाले. (Sanjay Raut On BJP)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्याचा प्रयत्न केला तर शरद पवार यांना घरी जाऊ देणार नाही. रस्त्यात अडवू, अशी धमकी भाजपचा एक केंद्रीय मंत्री देतो. ही भाजपची अधिकृत भूमिका असेल तर तसे जाहीर करा. सरकार टिकेल किंवा जाईल… पण शरद पवार यांच्या बाबत अशी भाषा महाराष्ट्राला मान्य नाही.” असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. (Sanjay Raut On BJP)

दरम्यान, ‘जे लोक बाहेर गेले, त्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे की काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत असल्याने ते नाराज आहेत.
मग ही नाराजी या आधी का काढली नाही? हिंदुत्वाचा मुद्दा या आधी का काढला नाही? संजय राऊत यांनी त्यांना इकडे येऊन भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं.
त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी त्यांना इकडे यावंच लागेल.”असं शरद पवार म्हणाले होते. त्यानंतर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
“माननीय शरद पवार साहेब या सर्वांना धमक्या देत आहेत, ‘सभागृहात येऊन दाखवा’, ते येणारच आहेत.
ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार. त्यांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठिण होईल.” असं ते म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut On BJP | shivsena leader and mp sanjay raut tweet on union minister narayan ranes threat to ncp leader sharad pawar

हे देखील वाचा :

Eknath Shinde | ‘माझ्यासोबत 50 आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ’ – एकनाथ शिंदे

Nitesh Rane | एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना टोला; म्हणाले – ‘त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…’

Pune Traffic Change | संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे जिल्ह्यातील वाहतुकीत काहीसा बदल; जाणून घ्या

Related Posts