IMPIMP

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने बोम्मई यांना पुढे करुन सीमावादाचा प्रश्न काढला’

by nagesh
Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | 'To divert attention from the issue of Shivaji Maharaj, BJP raised the issue of borderism by promoting Bommai'

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी
महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमाप्रश्नावरुन केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. बोम्मई यांनी सांगली तालुक्यातील जत तालुक्यावर दावा केला
आहे. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर देत धारेवर धरले आहे. तसेच त्यांनी भाजपवर देखील आरोप केले आहेत.
”कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान आणि उकरुन काढलेला वाद म्हणजे मोठे कारस्थान आहे.” असे संजय राऊत म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रावर जो अचानक हल्ला केला, यामागे खूप मोठे कारस्थान आहे. महाराष्ट्रात भाजपच्या लोकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांवर अपमानकारक वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात संतापाची लाट आहे. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित व्हावे, म्हणून बोम्मईंना पुढे करून महाराष्ट्रातल्या काही गावांवर हक्क सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. जेणेकरून लोकांनी दुसऱ्या विषयाकडे आपले लक्ष वळवावे आणि शिवाजी महाराजांवरील अपमान विसरावा.” असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue)

”कर्नाटकच्या मु्ख्यमंत्र्यांना संहिता (स्क्रिप्ट) लिहून दिली आहे. नाहीतर भाजपचा एक मुख्यमंत्री भाजपच्या
दुसऱ्या राज्यावर हल्ला करणार नाही. देशात असे कुठे दिसत नाही. भाजप एक शिस्तबद्ध पक्ष आहे.
ते आपापसांत कधीच भांडत नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराज मुद्द्यावरुन लोकांचे लक्ष दुसऱ्या मुद्यावर
वळविण्यासाठी हा सर्व कट आहे. आम्ही राज्यातील एक इंच जमीन देखील कर्नाटकला देणार नाही.
या मुद्यावरुन महाराष्ट्रात दुसरे महाभारत घडू शकते. शिंदे सरकारवरील महाराष्ट्राचा विश्वास उडत चालला आहे”. असे संजय राऊत म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘To divert attention from the issue of Shivaji Maharaj, BJP raised the issue of borderism by promoting Bommai’

हे देखील वाचा :

Amit Shah On Shraddha Walker Murder Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ पोलिसांची चौकशी होणार – गृहमंत्री अमित शहा

Amruta Fadnavis On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपालांचे महाराष्ट्रावर प्रेम, पण… , त्यांच्या विधानाचा नेहमी चुकीचा अर्थ घेतला जातो’ – अमृता फडणवीस

How To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन

Related Posts