IMPIMP

Sanjay Raut on Raj Thackeray | संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचाही गळा घोटला

by nagesh
Shivsena MP Sanjay Raut | sanjay raut press conference after bail attack on mns chief raj thackeray also said he will meet devendra fadnavis narendra modi amit shah

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut on Raj Thackeray | भोंगा आणि हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) यावरुन सध्या राज्यात वातावरण तापलं आहे. अशातच मनसे (MNS) आणि राज्य सरकार (Maharashtra State Government) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचं दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) आदेशानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहेत. तर दुसरीकडे पोलिसही अ‍ॅक्शन मोडमध्ये आलेत. दरम्यान, भोंग्यांवर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साईबाबा संस्थाननेही मोठा निर्णय घेतला आहे. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिर्डीतील साईबाबा संस्थानने (Shirdi Sai Baba Institute) मंदिरात पहाटे होणारी काकड आरती (Kakad Aarti) आणि रात्रीच्या शेजारतीच्यावेळी मंदिरावरील स्पीकर न लावण्याचा निर्णय घेतला. आजपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली. तसेच, शहरातील इतर धार्मिकस्थळांनीही या सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्देशांचे पालन करण्याचा निर्णय घेतला. शिर्डीच्या मंदिरांवरील भोंगे बंद झाल्याच्या मुद्द्यावरूनच राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

”भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचा सुद्धा गळा घोटला. शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरसह अनेक तीर्थस्थानावरील भोंगे बंद झाल्यामुळे पहाटेच्या काकड आरतीचा आनंद भाविकांना घेता आला नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांनुवर्षे भोंग्या द्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते.’’ असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत (Bhagyashree Banayat) यांनी सांगितले की, ”सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी काकड आरती आणि शेजारतीच्यावेळी स्पीकर बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले.
मागील अनेक वर्षांपासून या आरत्या स्पीकरवर गावाला ऐकवल्या जातात. पहाटे 5 वाजता भूपाळी होते.
5.15 वाजता काकड आरती केली जातेय. तसेच, रात्री 10 वाजता शेजारती होते.” असं ते म्हणाले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut on Raj Thackeray | shivsena mp sanjay raut slams raj thackeray about loudspeaker controversy

हे देखील वाचा :

Pune Police |’ हे तरुणाई, तुझ्यासाठी..! भोंगा, दंगा, पंगा अन् जातीय तेढीपासून दूर रहा’, पुणे पोलिसांचे कवितेतून तरुणांना आवाहन

Pune Crime | फुटपाथवर झोपण्याच्या वादातून एकाचा खून, पुण्यातील नाना पेठेतील घटना

BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईक यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

Related Posts