IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊतांचा खळबळजनक गौप्यस्फोट; म्हणाले – ‘आमच्या आमदारांचा खूनही होऊ शकतो’

by nagesh
MP Sanjay Raut | sanjay raut comment on biopic name and who will do his role know details

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनराज्याच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election 2022) मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते (Shiv Sena leader) आणि राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे शिवसेनेचे खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या आमदारांचा (MLA) खून होऊ शकतो. अनेक आमदारांनी तशा तक्रारी आमच्याकडे केल्या असून अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण झाल्याचा दावा करत त्यांना मारहाण केल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र आहेत. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम केले. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघेंसोबत (Anand Dighe) त्यांनी काम केले. त्यांचा गैरसमज दूर झाला असेल तर तो दूर केला जाईल. आम्ही त्यांना विनंती केली की मुंबईत या आणि चर्चा करा. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख (MLA Nitin Deshmukh) यांचे अपहरण (Kidnapping) करुन त्यांना सुरतमध्ये नेले आहे. अशा नऊ आमदारांना सुरतमध्ये नेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे. हे असंच सुरु राहिलं तर मुंबई पोलिसांना (Mumbai Police) कठोर अ‍ॅक्शन घ्यावी लागले, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

दरम्यान, सुरत येथे भाजपा (BJP) नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली.
काही वेळाने याठिकाणी अमित शाह (Amit Shah) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील पोहचणार आहेत.
त्यामुळे राज्यात राजकीय उलथापालथ होणार असल्याचं दिसून येत आहे.
एकनाथ शिंदे यांची गटनेते पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.
शिंदे यांच्याजागी अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांना जबाबदारी देण्यात आली.
मात्र आता एकनाथ शिंदे आणि समर्थक मंत्री संध्याकाळपर्यंत राजीनामा (Resignation) देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Sanjay Raut | our mlas can be murdered complaints made by many mlas wife sanjay rauts sensational reveal

हे देखील वाचा :

Sodium Deficiency Symptoms | ‘या’ लक्षणांमुळे शरीरात सोडियमची कमतरता निर्माण होऊ शकते; जाणून घ्या

Drinking Water Benefits | दिवसभरात प्या ‘इतके’ ग्लास पाणी, जाणून घ्या

Maharashtra Congress | शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसचे 5 आमदार ‘नॉट रिचेबल’

Related Posts