IMPIMP

Sanjay Raut | भाजप आमदाराचा खोचक टोला; म्हणाले – ‘संजय राऊत यांची ‘सूरत’ बघण्यासारखी झालीय’

by nagesh
Shivsena | shivsena saamana editorial targets ed and government over sanjay raut arrest maharashtra politics

परभणी : सरकारसत्ता ऑनलाइनएकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे निशाण फडकवल्याने शिवसेनेच्या (Shivsena) वरिष्ठ नेत्यांमध्ये
कमालीची अस्वस्थता आहे. शिवसेनेची भूमिका मांडणारे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे मंगळवारीही माध्यमांसमोर आले. त्यावेळी त्यांनी
केंद्रातील भाजप सरकार (BJP Government) आणि भाजप नेत्यांवर जबरी टीका केली. तसेच सूरतमधील (Surat) आमदार हे शिवसैनिक असून
एकनाथ शिंदे आमचे जिवाभावाचे आहेत, असेही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. राऊत यांनी शिवसेनेची सक्षमपणे बाजू मांडली. मात्र, त्यांचा
चेहरा सर्वकाही सांगत होता, यावरून भाजपच्या आमदाराने (BJP MLA) राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

विधान परिषदेचा निकाल (Vidhan Parishad Election Result) लागल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते. ते गुजरातच्या सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली. शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. काल दिवसभर मौन बाळगून असलेले एकनाथ शिंदे यांनी आज पहाटेपासून प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्यास सुरुवात केली. एकीकडे आपल्यासोबत 40 पेक्षा अधिक आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करण्याबाबत त्यांनी थेट उत्तर देणे टाळलं. तत्पूर्वी शिवसेनेकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधत रणनिती आणि पुढची दिशा सांगितली. तसेच सूरतमध्ये असलेले हे सर्व आमदार परत येतील, आमदारांना जबरदस्तीने ठेवलं आहे, असेही राऊत यांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांचा चेहरा काहीसा पडलेला दिसला. यावरुन भाजप आमदाराने राऊतांना टोला लगावला आहे.

परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) सेलू-जिंतूर मतदारसंघातील (Selu-Jintur Constituency) महिला आमदार मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी ट्विट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांची ‘सूरत’ बघण्यासारखी झाली आहे, असे ट्विट बोर्डीकर यांनी केले आहे.

Web Title :- Sanjay Raut | sanjay rauts appearance and surat is worth watching mlas meghna bordikar sharp tweet

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray Corona Positive | राज्यपालांनंतर आता उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण

Udayanraje Bhosale | राजकीय घडामोडींवर उदयनराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘महाविकास आघाडीचं चुकून जुळलं होतं, फार काळ टिकणार नव्हतंच’

Pune Crime | जुन्या वादातून महिलेच्या नावाने अश्लिल मेसेज करुन तिचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याची केली बदनामी

Related Posts