मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची (Shivsena Rebel MLA) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर
पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाई. मात्र या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील 24 तासात त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav
Thackeray) यांच्यासमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, असे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत
सांगितले होते. त्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एक सूचक ट्विट केलं आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विटमध्ये म्हटले की, चर्चेतून मार्ग निघू शकतो. चर्चा होऊ शकते. घरचे दरवाजे उघडे आहेत. का उगाच वण वण भटकताय ? गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ ! जय महाराष्ट्र ! असं ट्विट राऊत यांनी केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी बंडखोर आमदारांना चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले आहे.
चर्चेतून मार्ग निघू शकतो.
चर्चा होऊ शकते.
घरचे दरवाजे उघडे आहेत..
का उगाच वण वण भटकताय?
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ!
जय महाराष्ट्र!— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2022
काय म्हणाले होते राऊत ?
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. परंतु आमदारांनी 24 तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असेही राऊत म्हणाले होते. वर्षावर आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.
Web Title :- Sanjay Raut | shiv sena leader sanjay raut tweets come back and discuss eknath shinde other mlas maharashtra political crisis
High Blood Sugar | ‘ही’ 5 लक्षणे दिसताच समजून जा की खुप वाढली आहे ब्लड शुगर, ताबडतोब लक्ष द्या
Online Ration Card | रेशन कार्डसाठी करा ऑनलाईन अर्ज; घर बसल्या करू शकता ‘हे’ काम, जाणून घ्या
Natural Teeth Whiteners Fruits | पाच पदार्थ आणि फळं, ज्याच्या सेवनाने तुमचे दात चमकतात