IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊतांचं जोरदार उत्तर; म्हणाले – ‘फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही.…’

by nagesh
Sanjay Raut on Devendra Fadnavis | shivsena leader and mp sanjay raut answers bjp leader devendra fadanvis question over hanuman chalisa row

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | आगामी पाच राज्यांच्या निवडणुका (Five State Elections) फेब्रुवारीत होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यातच महाराष्ट्रात देखील राजकारणाची चर्चा जोरात होताना दिसत आहे. गोव्यातील निवडणुकीबाबत (Goa Elections) बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेवर (Shivsena) निशाणा साधला. ‘महाराष्ट्रात ज्याप्रकारे 3 पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही, तसेच शिवसेनेने आपलं डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावं,’ असा टोलाही त्यांनी लगावला. यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पलटवार केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

‘शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल’ असा विश्वास संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला आहे. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामधून तिकडे गेले आहेत, ते गेल्यावर भाजपा तिथे फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपाचे आमदारही पक्ष सोडून गेले. तेव्हा त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे ते बघावे,’ असा टोला राऊत फडणवीसांना लगावला.

‘गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपाचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत, विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत.
त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका असं सांगण्याचा प्रयत्न करेल.
शिवसेना हा सर्वसामान्यांचा, बहुजनांचा, हिंदुत्ववादी पक्ष आहे.
शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे.
फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उत्तर प्रदेशात भाजपामधून काही नेते बाहेर पडल्यासंबंधी विचारण्यात आले असता त्यावर संजय राऊत म्हणाले,
‘भाजपामध्ये लागलेली गळती ही सुरुवात आहे.
ओपिनियन पोलनुसार भाजपा पुन्हा एकदा सत्तेवर येईल असं सांगितलं जातंय,
आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. सत्तेत येणाऱ्या पक्षांना कधी गळती लागत नाही.
मंत्री, आमदार, प्रमुख कार्यकर्ते पक्ष सोडत नाहीत.
त्यामुळे उत्तर प्रदेशचा प्रवास हा राजकीय परिवर्तनाच्या दिशेने सुरू आहे याची खात्री असल्याचं ते म्हणाले.’

Web Title :-  Sanjay Raut | shivsena leader and MP sanjay raut bjp devendra fadanvis goa election

हे देखील वाचा :

Post Office Small Savings Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 333 रुपयांची गुंतवणूक तुम्हाला देईल 8.22 लाख रुपयांची रक्कम, जाणून घ्या कशी

Maharashtra Police Transfer | वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्यांची यादी मुख्यमंत्र्यांच्या सहीशिवाय व्हायरल, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

CM Uddhav Thackeray | पाचवीच्या विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र; जाणून घ्या काय म्हंटले आहे ‘या’ पत्रात

Related Posts