IMPIMP

Sanjay Raut | शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेनेचे नाराज आमदार हे पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Cabinet Minister Eknath Shinde) यांच्यासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना फुटणार नसल्याचा दावा केला आहे. शिवसेना ही निष्ठावान सैनिकांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी महाराष्ट्राच्या (Maharashtra) पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांची औलाद नाही. त्यामुळे शिवसेनेत दरी निर्माण होणार नाही. जे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पहात असाल, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Election Result) काही आमदारांचा संपर्क होत नाहीये हे सत्य आहे. काही आमदार मुंबईत नाहीत. पण आज सकाळपासून काही आमदारांचा संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमजातून त्यांना बाहेर नेण्यात आले आहे. एकनाथ शिंदे बाहेर असून त्यांच्यासोबत संपर्क झालेला आहे. जे चित्र निर्माण केले जात आहे त्यामध्ये शिवसेनेला कोणतेही तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशास्पद वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात बैठक आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शिवसेना दुबळी करण्याचे कारस्थान

महाराष्ट्रामध्ये राजस्थान (Rajasthan) आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे (Madhya Pradesh Pattern) उद्धव ठाकरेंचे सरकार (Uddhav Thackeray Government) पाडावे अशा प्रकारची हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यांचे प्रयत्न सुरु आहेत पण महाराष्ट्रात चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. शिवसेनेवर घाव घालणे म्हणजे महाराष्ट्र दुबळा करणे. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा (Mumbai BJP President Mangalprabhat Lodha) यांनी कालच्या निकालांवर मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. यासाठी तुम्हीच फाटाफूट घडवून आणत आहात का ? मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेना दुबळी करण्याचे कारस्थान असल्याचे संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे जीवाभावाचे सहकारी

ज्या क्षणी त्यांच्याशी संपर्क होईल ते परत येतील. एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते.
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी ते प्रयत्न करत होते. एकनाथ शिंदे जीवाभावाचे सहकारी आहेत.
त्यामुळे त्यांच्यासोबत जोपर्यंत बोलणे होत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणतेही विधान करणार नाही, असेही राऊत यांनी सांगितले.

Web Title :-  Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut reaction about maharashtra minister eknath shinde

हे देखील वाचा :

Cervical Treatment | सर्व्हायकलने केले असेल जगणे अवघड, तर ‘या’ पद्धतीने दूर होतील वेदना, जाणून घ्या

Chitra Wagh On Shiv Sena | ‘काल काही फुटले, आज 13 झाले, यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात’; चित्रा वाघ यांचा टोला

Karuna Sharma Arrested | पुणे पोलिसांकडून करूणा शर्मासह दोघांना मुंबईतून अटक

Related Posts