IMPIMP

Sanjay Raut | ‘फडणवीसांची अवस्था म्हणजे कोणी खुर्ची देता का…’ – शिवसेना खासदार संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | shivsena leader and MP sanjay raut replied to devendra fadnavis over utpal parrikar candidature in goa election

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | आगामी फेब्रुवारीत गोवा विधानसभा निवडणुकीचा (Goa Assembly Election) रणसंग्राम आहे. यातच अनेक पक्ष आपला अँक्शन प्लान तयार करण्याच्या तयारीला लागला आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुकीवरून आता महाराष्ट्राच्या राजकारणात वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. गोवा निवडणुकीच्या मैदानात शिवसेनेने (Shiv Sena) देखील उडी घेतल्याने भाजप (BJP) हा शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहे. दरम्यान नुकतंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या टीकेला संजय राऊत यांनीही पलटवार केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”संजय राऊतांना (Sanjay Raut) नटसम्राटाची भूमिका द्यायला पाहिजे. ते सकाळी वेगळं आणि संध्याकाळी वेगळं बोलतात. त्यांनी आधी नटसम्राटपणा थांबवावा,” अशी टीका देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली होती. यावरून संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत म्हणाले, ”गोव्याला रंगभूमीचा खूप मोठा वारसा आहे. नटसम्राटाचा महाराष्ट्राला मोठा वारसा आहे. महाराष्ट्रातले सर्व नटसम्राट हे गोव्यातून गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. फडणवीस गोव्याच्या जनतेचा, नाट्यकर्मींचा अपमान करतात. नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे, कोणी मला घर देता का घर घर. अगदी तशीच फडणवीसांची अवस्था आहे. कोणी मला खुर्ची देता का खुर्ची अशी फडणवीसांची अवस्था आहे. असं ते म्हणाले.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, ”नटसम्राट म्हटल्यानं मला वाईट वाटलं नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत.
मला आनंद आहे, की त्यांनी नटसम्राट म्हटलं. पण, आम्ही शब्द फिरवणारे सोंगाडे नक्कीच नाही.”
रम्यान, ”संजय राऊतांचे अश्रू मगरीचे आहेत. मनोहर पर्रीकर आजारी असताना ते काय बोलत होते?” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
यावरुन संजय राऊत म्हणाले, ”महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी तुम्ही बोलले आहात. त्यावेळी पर्रीकर सक्रीय नव्हते म्हणून बोलत होतो.
पण, त्यांचं काही दुर्दैवी व्हावं अशी आमची भूमिका नव्हती. आम्ही इतके निर्दयी नाहीत.
उत्पल पर्रीकर यांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. पण, ते स्वतंत्र लढले तर आम्ही उमेदवार नाही.”

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, ”भाजप हा नक्कीच क्रमांक एकच पक्ष आहे. पण, तो क्रमांक एकचा विरोधी पक्ष आहे.
कारण त्यांच्याकडे 105 आमदार आहेत. त्यांनी त्यांचं स्थान नगरपंचायतीत देखील कायम ठेवलं आहे.
त्याबाबत त्यांचं अभिनंदन आहे,” अस देखील पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and MP sanjay raut replied to devendra fadnavis over utpal parrikar candidature in goa election

हे देखील वाचा :

Pune Crime | दुर्देवी ! काही दिवसातच होतं लग्न अन् काळाने केला मोठा घात…

OBC Reservation NEET, PG | सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपुर्ण निर्णय ! वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये 27 टक्के OBC आरक्षण कायम
e-EPIC Voter ID Card | शहर किंवा राज्य बदलल्यास नवीन वोटर आयडी कार्डची गरज नाही, निवडणूक आयोगाने सुरू केली नवी सुविधा, जाणून घ्या सविस्तर

Related Posts