IMPIMP

Sanjay Raut | 21 आमदारांशी संपर्क ! विजय महाविकास आघाडीचा असेल; संजय राऊतांच्या एकाचवेळी दोन भूमिका

by nagesh
MP Sanjay Raut | maharashtra politics crisis next hearing on february 14 sanjay raut said everything will be done with love

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेना खासदार (Shivsena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील (Osmanabad MLA Kailas Patil) आणि नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या उपस्थित पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन वेगळ्या भूमिका मांडल्या, सुरुवातीला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा संघर्ष विधानसभेत पोहोचल्यास महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) विश्वास दर्शक ठरावात विजयी होईल, असं म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) पुन्हा वर्षावर येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटील आणि देशमुख बोलल्यानंतर संजय राऊत यांनी गुवाहाटीमधील आमदारांना 24 तासात मुंबईत या, उद्धव ठाकरेंसमोर प्रस्ताव मांडा, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करेल, असे आवाहन त्यांनी बंडखोर आमदारांना केलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्यासोबत असलेल्या 42 आमदारांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करत गुवाहाटीमधून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील 21 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. तसेच कुणी कितीही फोटो व्हिडीओ पाठवावेत. मात्र ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा त्यातील 21 आमदार हे शिवसेनेचे असतील या आमदारांशी उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला असल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले, जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज इथे नसले तरी लवकरच ते वर्षा बंगल्यावर येतील.
गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात जे राजकीय संकट सुरु आहे. त्यात मुंबईतून कोण कुठे जातंय या बातम्या दिल्या जात आहे.
त्यादरम्यान, शिवसेनेचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख इथे उपस्थित आहेत. त्यातील एक सूरतवरुन आले आहेत.
तर दुसरे गुवाहाटीवरुन आले आहेत. त्यांना तिथून येताना जो संघर्ष करावा लागला ती कहाणी थरारक आणि रोमांचक आहे.
भाजपाने शिवसेनेच्या आमदारांना अपहरण (Kidnapping) करुन फसवून नेलंय आणि त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मी त्याबाबत उद्धव ठाकरेंशी वारंवार बोललो आहे, असे राऊत म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut said we will ready to discuss rebel mla proposal of left mva if they come in mumbai

हे देखील वाचा :

Mahavikas Aghadi | ‘मुख्यमंत्र्यांनी 24 तासात यू-टर्न घेतला तर…’; संजय राऊतांच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

Eknath Shinde | संजय राऊतांच्या ‘परत या’ आवाहनानंतर एकनाथ शिंदेचं थेट उत्तर; म्हणाले – ‘आता गाडी…’

Mumbai-Pune-Deccan Queen | नव्या लुकमध्ये ‘डेक्कन क्वीन’ पुण्यात दाखल

Related Posts