IMPIMP

Sanjay Raut | महामोर्चा म्हणून संजय राऊतांनी ट्वीट केला मराठा मोर्चाचा व्हिडीओ; प्रकार लक्षात आल्यावर राऊतांची सारवासारव

by nagesh
Maharashtra Politics News | bjp is burdened by eknath shinde government said mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – शनिवारी (दि.17) काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेनेसह (Shiv Sena) विविध समविचारी संघटनांनी आणि पक्षांनी मुंबईत महामोर्चा (MVA Mahamorcha) काढला होता. या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य करताना छोट्या शिवसेनेचा छोटा मोर्चा, शिवसेनेचा मोर्चा नॅनो मोर्चा होता, असे म्हटले होते. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडिओत मुंबईच्या जे जे पुलावरून लाखो लोक पायी निघाले आहेत. पण संजय राऊतांनी (Sanjay Raut) ट्वीट केलेला हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चातील (Maratha Kranti Morcha) असल्याचा प्रकार आता उघड झाला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संजय राऊत यांचे ट्वीट सध्या चर्चेचा विषय झाला आहे. त्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यू टर्न घेतला आहे. मराठा मोर्चा आमचा नव्हता का? मी त्या ट्वीटमध्ये कुठे म्हटले आहे की, तो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. माझे ट्वीट नीट पाहा. त्यात मी कुठेही दावा केलेला नाही. फडणवीस मराठा मोर्चाला देखील नॅनो मोर्चा म्हणत होते. महाविकास आघाडीच्या मोर्चाचे इतर व्हिडीओ मी टाकले आहेत. त्या मोर्चाला मी महाविकास आघाडीचा मोर्चा म्हटले नाही. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राच्या न्याय हक्कांसाठी होते. दोन्ही मोर्चे स्वाभिमानासाठी निघाले होते. मराठा मोर्चात सहभागी असलेले लोक महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मोर्चात देखील सहभागी झाले होते. त्यावर भाजप (BJP) एवढी टीका का करत आहे, त्यांना एवढी टीका करण्याचे काही कारण नाही.

कोणत्याही मोठ्या विराट मोर्चाला नॅनो मोर्चा म्हणायचे ही भाजपची प्रथा आहे. मराठा मोर्चा देखील आमचा होता.
मराठा मोर्चाने महाराष्ट्राची शक्ती दिल्लीला दाखवली होती.
आणि महाविकास आघाडीच्या मोर्चाने देखील आपली शक्ती दिल्लीला दाखवली आहे.
ते मोर्चावर टीका करतात पण मोर्चातील मागण्यांवर बोलत नाहीत. त्यांनी मोर्चा कोणताही असो त्याला न्याय द्यावा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) झालेल्या अपमानावर बोलावे,
असे राऊत म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut criticized bjp

हे देखील वाचा :

Beed Minor Girl Gang Rape Case | बीड हादरले; अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार

Weight Loss Tips | “या” वस्तूने कमी होईल वाढणारे वजन; अलाया एफ (Alaya F) सारखे सपाट पोट

Winter Session 2022 | कर्नाटक सीमाप्रश्नी विरोधक आक्रमक; विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धरले सरकारला धारेवर…

Related Posts