IMPIMP

Sanjay Raut | ‘पहाटेच्या शपथविधीला 2 वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील’ – संजय राऊत

by nagesh
Sanjay Raut | shivsena leader and MP sanjay raut on bjp chandrakant patil maharashtra government cm uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | शिवसेनेचे नेते (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात आज (मंगळवार) जवळजवळ दोन तास बैठक झाली. या दरम्यान विविध मुद्दयांवर चर्चा झालीय. एसटी संपाच्या (ST Workers Strike) बाबत देखील बैठकीत चर्चा झाली आहे. या झालेल्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर (BJP) तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर (Chandrakant Patil) निशाणा साधला आहे. त्यावेळी राऊत हे माध्यमांशी बोलत होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

त्यावेळी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ‘चंद्रकांत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा विधान केलं आहे की, हे सरकार जाईल म्हणून. चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रात भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यांनी असं बोलणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याने हे सरकार काही जात नाही. हे सरकार पुढील 25 वर्षे टिकेल आणि या सरकारचं पावर स्टेशन मी आत्ता जिथे आहे तेथे आहे.

पुढे राऊत म्हणाले, ‘चंद्रकांत पाटलांना शपथविधीचे झटके पहाटेच्या शपथविधीला आज 2 वर्षे होत आहेत. बहूतेक त्याच शपथविधीचे झटके चंद्रकांत पाटलांना बसत असावेत आणि म्हणून ते सारखं बोलत आहेत की, सरकार पडेल, सरकार पडेल. झोपेतून जागे व्हा इतकेच मी त्यांना सांगू इच्छितो,’ असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राऊत-पवार बैठकीत चर्चा काय?

आज महाराष्ट्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या प्रश्नांसंदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्यासंदर्भात चर्चा झाली.
शरद पवारांसोबत राज्यातील गंभीर विषयांवरच चर्चा झाली.
तर, परमबीर सिंग यांचा विषय शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली जाईल इतका मोठा विषय नाही.
असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. तसेच, शरद पवारांनी सकारात्मक सूचना दिल्या एसटीचा विषय गंभीर आहे.
लवकरचं तो विषय सुटेल. एसटी संपाबाबत शरद पवार आणि परिवहन मंत्री यांच्यात चर्चा झाली आहे.
लवकरच यातून तोडगा निघेल. आजच्या पवार यांच्या बैठकीतुन असं मला समजलं की त्यांनी सकारात्मक सूचना दिल्या आहेत.

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on bjp leader chandrakant patil

हे देखील वाचा :

IND Vs NZ Test Series | कानपूर टेस्ट मॅचपूर्वी चेतेश्वर पुजाराकडून किवींना ‘इशारा’

Pune Crime | पुण्यातील आयबी गेस्ट हाऊसमध्ये धक्कादायक प्रकार ! सुरक्षा रक्षकानं बाथरूममध्ये अंघोळ करणार्‍या 36 वर्षीय महिलेचं केलं व्हिडीओ शुटिंग

Multibagger Stock | 257 रुपयांचा शेयर झाला रू. 972 चा, 1 वर्षात 5 लाखाचे झाले 19 लाख, तुमच्याकडे आहे का?

Related Posts