IMPIMP

Sanjay Raut | राज्यपालांच्या पदमुक्त होण्याच्या चर्चेनंतर श्रेयासाठी शिवसेना सरसावली; संजय राऊत म्हणाले – ‘शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच…’

by nagesh
Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on governor bhagatsingh koshyari relieve for post governor

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   गेले अनेक दिवस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुन विरोधकांनी भाजप आणि राज्य सरकारला धारेवर धरत त्यांना हटवण्याची मागणी केली आहे. याच दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या जवळच्या व्यक्तीकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोश्यारी यांनी पुन्हा आपल्या राज्यात जाण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचेही म्हटले आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

“राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!” असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे.

दरम्यान, राज्यपालांच्या विधानाचा निषेध नोंदवताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘हे केंद्रच पार्सल माघारी घेऊन जा अन्यथा महाराष्ट्र बंद करू,’ अशी भूमिका घेतली होती. शिवसेनेच्या या चेतावणीनंतर राज्यपालांना त्यांच्या पदावरून काढण्यात येत असल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील राज्यपाल यांचा काय तो निकाल राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी लावावा, अशी मागणी केली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut on governor bhagatsingh koshyari relieve for post governor

हे देखील वाचा :

Beed Crime | पोलीस व्हॅनचे स्टेअरिंग ओढून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न, व्हॅन उलटून 4 पोलिसांसह 7 जण जखमी

Molestation Case | विनयभंगाच्या कलमाखाली आरोपी महिलेला दोषी ठरविण्याचा न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

Pune Crime | बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या अनिल चव्हाण व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 110 वी कारवाई

Related Posts