IMPIMP

Sanjay Raut | दिल्लीत FIR दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut | shivsena sanjay raut on mns raj thackeray bjp nitin gadkari meeting

मुंबई / नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप कार्यकर्त्यांसाठी अपशब्द वापरल्या प्रकरणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दिप्ती रावत भारद्वाज (dipti rawat bhardwaj) यांनी मंडावली पोलीस ठाण्यात (mandawali police station) तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आता खासदार राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली असून राजकीय सूडभावनेतून आणि माझा आवाज दाबण्यासाठी दिल्लीत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता ED, CBI आणि आयकरचा वापर माझ्याविरोधात होऊ शकत नाही म्हणून पक्षाची बदनामी करण्यासाठी हा गुन्हा दाखल केला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दलच नाही, तर महिलांबद्दलही चुकीचे शब्द वापरले असल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर करण्यात आला
असून त्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राऊत यांच्यासारख्या घटनात्मक पदावर विराजमान झालेले नेते, ज्यांची समाजाबद्दल जबाबदारी
सामान्यांपेक्षा अधिक आहे, असे भारद्वाज यांनी सांगितले. देशातील महिला आणि भाजप महिला मोर्चा त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, राजकीय सूडभावनेतून आणि माझा आवाज दाबण्यासाठी माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ईडी, सीबीआय आणि आयकरचा वापर माझ्याविरोधात केला जाऊ शकत नाही.
म्हणून माझ्या पक्षाला बदनाम करण्यासाठीच हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मी खासदार असून खोटी तक्रार दाखल करण्यासाठी काही लोकांना उकसवण्याचे काम केले जात असिन ते योग्य नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut reaction after fir filed against him in mandawali police station of delhi

हे देखील वाचा :

Ankita Lokhande | अंकिता लोखंडेने साखरपुड्यामध्ये वाजवलं सुशांतच्या चित्रपटातील ‘हे’ गाणं

Alia Bhatt | आलिया भट्टनं सैफ अली खानच्या मुलाला केलं ‘रिजेक्ट’ ! केली रणवीरची निवड, पाहा व्हायरल Video

Gold-Silver Rate Today | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या पुण्यातील आजचे दर

Related Posts