IMPIMP

Sanjay Raut | राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला? संजय राऊत म्हणाले…

by nagesh
Sanjay Raut on BJP | bjp support to gunaratna sadavarte direct allegation of sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या प्रकृतिअवस्थेमुळे अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र या चर्चांना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पूर्णविराम दिला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांनी (Sanjay Raut) यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले २०१९ विधानसभा निवडणूक निकालानंतर अनेक घडामोडी झाल्या. त्याचा मी साक्षीदार आहे. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्या महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्त्वात आल्यानंतर सरकारचे नेतृत्व पाच वर्षे उद्धव ठाकरे करतील आणि सरकार पाच वर्षे टिकेल असे सरकारमधील नेते वारंवार सांगत असतात. मात्र मुख्यमंत्री बदलणार अशा पुड्या कोण सोडत हे मला माहिती नाही. असे त्यांनी म्हंटले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

संजय राऊत म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी स्थापन होण्याचा मी साक्षिदार आहे. कोणाच्याही डोक्यात हि कल्पना नव्हती किंवा असं होऊ शकत अस वाटलं नव्हतं.
त्यावेळी निकाल सुरू असताना मी शरद पवारांकडे जाऊन असं होऊ शकत असं सांगितलं. तेव्हा काय चर्चा झाल्या हे मला माहिती आहे.
त्याचवेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे पूर्ण वेळ करणार असं स्पष्ट केलं होतं.
त्यामुळे या सरकारचा कालखंड पाच वर्षाचा आहेत त्यांच्या मनात शंका नाही.
कोणी कितीही खेचाखेची केली तरी सरकार पडणार नाही, असे राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

२०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला.
२०२४ मध्ये हेच सूत्र कायम राहणार का या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये एकवेळ अशी आली होती.
राष्ट्रवादीचे जास्त आमदार असतानाही काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला होता.
आमची कमिटमेंट ही पाच वर्षांची आहे. त्यानंतर निवडणुकीला सामोरे जाऊ.
मी नेहमी सांगत आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ काम करेल.
इतकंच नाही तर मुख्यमंत्रिपदाची पाच वर्षांची टर्म उद्धव ठाकरे पूर्ण करतील.
तेच प्रदीर्घ काळ ते मुख्यमंत्री राहतील.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Sanjay Raut | two and half year formula post chief minister maharashtra sanjay rauts big statement said uddhav thackeray will be

हे देखील वाचा :

Australian Test Team Captain | 65 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ फास्ट बॉलर बनला टेस्ट टीमचा कॅप्टन !

Malaika Arora | रेड कार्पेटवर मलाईका अरोरा झाली चक्क Oops Moment, फोटो व्हायरल

Pune Crime | बारामतीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, महिलेला अटक

Related Posts